नवी दिल्ली - स्पाईसजेट विमान कंपनीने सर्व ऑपरेटिंग केबिन क्रू कर्मचाऱ्यांना लशीचा पहिला डोस दिला आहे. गेल्या महिन्यात स्पाईसजेटने कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू केले आहे.
स्पाईसजेट कंपनीकडून कर्मचाऱ्यांचे प्रायोजित लसीकरण दिल्ली आणि गुरुग्राममध्ये सुरू झाले. ही लसीकरण मोहिम देशातील सर्व ऑपरेटिंग स्टेशनवर विस्तारित करण्यात आली आहे. त्यासाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन करण्यात आले आहे.
हेही वाचा-राज्य सरकारकडून आषाढी वारी संदर्भात नियमावली जारी; मानाच्या 10 पालख्यांना पायी दिंडीची परवानगी
जे कोरोनामधून बरे झाले आहेत, त्यांचा लसीकरण करण्यात आलेल्या केबीन क्रूमध्ये समावेश नाही. तसेच सरकारी नियमानुसार अपात्र असलेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसल्याचे स्पाईसजेटने म्हटले आहे. स्पाईसजेट कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, की लसीकरण झाल्याने प्रवासी व कर्मचाऱ्या या दोन्हींचे हित व सुरक्षितता होईल. विमान कंपनीमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्याने कर्मचाऱ्यांचा प्रचंड उत्साह वाढेल. तसेच प्रवास आणि पर्यटनाला चालना मिळू शकले. त्या दृष्टीने स्पाईसजेट वाटचाल करत असल्याने आनंद वाटत आहे.
हेही वाचा-खासदार संभाजी व खासदार उदयनराजे भोसले यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करा - अॅड. सदाव