ETV Bharat / business

टाटा सन्सच्या माजी संचालकाला मनी लाँड्रिग प्रकरणात ईडीची नोटीस - Tata Sons

नोटीसप्रमाणे आर. वेंकटरामणन यांना १० फेब्रुवारीला दिल्लीमधील ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. मनी लाँड्रिगप्रकरणी ईडीचे अधिकारी त्यांची चौकशी करणार आहेत.

ED
ईडी
author img

By

Published : Jan 25, 2020, 7:19 PM IST

नवी दिल्ली - सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाटा सन्सचे माजी संचालक आर. वेंकटरामणन यांना एअर एशियाप्रकरणी नोटीस बजावली आहे. नोटीसप्रमाणे वेंकटरामणन यांना १० फेब्रुवारीला दिल्लीमधील ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

मनी लाँड्रिगप्रकरणी ईडीचे अधिकारी टाटा सन्सचे माजी संचालक आर. वेंकटरामणन यांची चौकशी करणार आहेत. टाटा सन्सच्या प्रवक्त्याने म्हटले, आर. वेंकटरामणन यांनी ईडीच्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याचे वृत्त चुकीचे आहे. ते चौकशीला हजर राहणार आहेत.

हेही वाचा-चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट वाढून ३.८ टक्के होण्याची शक्यता - अहवाल

एअर एशिया इंडिया लि. कंपनीबाबत आर. वेंकटरामणन यांनी कोणतेही चुकीचे केले नसल्याचेही प्रवक्त्याने टाटा सन्सच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. वेेंकटरामणन हे टाटा ट्रस्टचे माजी विश्वस्त होते. दरम्यान, आर. वेंकटरामणन हे सध्या, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीसाठी काम करत असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

हेही वाचा-आयसीआयसीआय बँकेने तिसऱ्या तिमाहीत मिळवला दुप्पट नफा

Intro:Body:

Dummy business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.