ETV Bharat / business

७४० कोटींचे फसवणूक प्रकरण : सिंग बंधूंसह इतर आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी - रिलीगेअर फिनवेस्ट

अटकेतील आरोपींवर रिलीगेअर फिनवेस्ट कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यातून कंपनीचा सुमारे २ हजार ३९७ कोटींचे नुकसान झाले आहे.

संग्रहित- मालविंदर व शिविंदर सिंग
author img

By

Published : Oct 11, 2019, 4:38 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली न्यायालयाने फोर्टिस हेल्थकेअरचा माजी प्रवर्तक मालविंदर सिंग, त्याचा भाऊ शिविंदर आणि तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अटकेतील आरोपींवर रिलीगेअर फिनवेस्ट कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यातून कंपनीचा सुमारे २ हजार ३९७ कोटींचे नुकसान झाले आहे.

दिल्ली न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीची चौकशी करण्यासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या आरोपींना दिल्ली पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. मालविंदरला (४६ ) शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. तर शिविंदर (४४), सुनील गोधवानी (५८), कवी अरोरा (४८) आणि अनिल सक्सेना यांना आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली आहे.

हेही वाचा-करमुक्त दुकानातील वस्तुंवर जीएसटी लावता येणार नाही - मुंबई उच्च न्यायालय

ईडीनेही टाकले होते छापे
रिलिगेअर फिनवेस्ट लि. कंपनीने दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेत गतवर्षी डिसेंबरमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर सिंग बंधूवर ७४० कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चालू वर्षात ऑगस्टमध्ये सक्त आर्थिक अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रॅनबॅक्सीचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मालविंदर सिंग आणि त्याचा भाऊ शिविंदर सिंग यांच्या घरांवर छापे टाकले होते. ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी ही कारवाई केली होती.

हेही वाचा-वाहन उद्योगांवरील मंदीचे सावट कायम; प्रवासी वाहनांच्या विक्रीत सलग ११ व्या महिन्यात घट

Intro:Body:

Dummy-Businessnews

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.