हैदराबाद - ब्राझीलने भारत बायोटेकने उत्पादित केलेल्या कोव्हॅक्सिनच्या आयातीला परवानगी दिली आहे. यापूर्वी ब्राझीलची आरोग्य संस्था अनविसाने कोव्हॅक्सिनच्या आयातीला परवानगी देण्यास नकार दिला होता. कोरोना लसचे उत्पादन होणाऱ्या संयंत्रांमधून जीएमपीचे निकष पूर्ण होत नसल्याचे अनविसाने म्हटले होते.
अनविसाने रशियाच्या स्पूटनिकच्या आयातीलाही परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यात ब्राझीलला कोव्हॅक्सिनला 40 लाख लशींचे डोस मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर अनविसाकडून लशीच्या वापराबाबत विश्लेषण केले जाणार आहे. या आकडेवारीच्या निकषानंतर कोव्हॅक्सिनच्या पुढील आयातीबाबत ब्राझीलकडून निर्णय घेण्यात येणार आहे.
हेही वाचा-भारत आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन लस प्रभावी
कोव्हॅक्सिनची कॅनडामध्येही होणार विक्री
भारत बायोटेकने अमेरिकन कंपनी ओक्युजेनबरोबर कॅनडामध्ये लशीची व्यावसायिक विक्री करणार असल्याचे जाहीर केले आहे. भारत बायोटेकने 2 फेब्रुवारी 2021 ला अमेरिकेमध्ये ओक्युजेन या जैवऔषधी कंपनीबरोबर केला आहे. या करारानुसार भारत बायोटेक ही ओक्युजेन कंपनीला कोव्हॅक्सिनची अमेरिकेत पुरवठा आणि विक्रीची परवानगी देणार आहे.
हेही वाचा-COVAXIN च्या २ ते १८ वयोगटातील चाचण्या जूनमध्ये, जुलै-सप्टेंबरपर्यंत मिळणार परवानगी
जागतिक आरोग्य संघटनेकडून जुलै ते सप्टेंबरपर्यंत कोव्हॅक्सिनला मिळणार परवानगी
कोरोना लस कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी जुलै ते सप्टेंबरपर्यंत परवानगी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला 60 हून अधिक देशांमध्ये नियामक संस्थांकडून परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अमेरिका, ब्राझील आणि हंगेरी या देशांचा समावेश असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.