मुंबई - कोरोना महामारीमुळे टाळेबंदी असताना आयटी श्रेत्रातील अनेक कर्मचारी महिनभरापासून घरातून काम करत आहेत. आयटी उद्योगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते भविष्यातही आयटीचे कर्मचारी पूर्ववत स्थिती झाली तरी घरातून काम करणार आहेत.
आयटीसह, बँका व विविध कंपन्यांचे कर्मचारी घरातून काम करत आहेत. देशात २५ मार्चपासून ३ मेपर्यंत टाळेबंदी आहे. त्यानंतर टाळेबंदी सुरू राहणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर एन. गणपती सुब्रमण्यन यांनी घरातून काम करण्याच्या कार्यपद्धतीविषयी मत व्यक्त केले. ते म्हणाले, की २०२५ पर्यंत केवळ २५ टक्के कर्मचाऱ्यांनी कार्यालयामधून काम करावे, अशी अपेक्षा आहे. मात्र, कंपनीने तसे उद्दिष्ट अजून निश्चित केले नाही.
हेही वाचा-अक्षय्य तृतीया : ऑनलाईन सोने खरेदीला चांगला प्रतिसाद; नाणे खरेदीकडे ग्राहकांचा ओढा
कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घरातून काम केल्यास कंपन्यांच्या खर्चात बचत होवू शकणार आहे. कंपन्यांमध्ये नोकऱ्या करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ने प्रदूषण आणि वाहतूक कोंडीसारख्या समस्येला आजवर तोंड द्यावे लागत होते.
हेही वाचा-कोरोना लढा : अतिश्रीमंतावर ४० टक्के कर लागू करा, महसूल अधिकाऱ्यांची सरकारला शिफारस