नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी उद्योजक अभय फिरोदिया ग्रुपने २५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या निधीचा वापर महामारीच्या काळात दिलासा देण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामांसाठी करण्यात येणार आहे.
अभय फिरोदिया ग्रुपच्या जयहिंद इंडस्ट्रीज यांच्या फोर्स मोटर्स आणि जयहिंद मॉनटुपेट अशा कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून २५ कोटींचा निधी हा कोरोनाच्या संकटाच्या काळात काम करणाऱ्या एनजीओ, वैद्यकीय आस्थापना व नागरिकांसाठी देण्यात येणार आहे. या निधीमधून आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करण्याचा उद्देश आहे. तसेच रक्ताचे नमुने चाचणी घेणे, मोबाईल क्लिनक चालविणे अशा उद्देश असल्याचे अभय फिरोदिया ग्रुपने म्हटले आहे.
हेही वाचा-कोरोनाविरोधात लढा : देशांतर्गत विमान सेवा ३१ मार्च नव्हे १४ एप्रिलपर्यंत स्थगित!
ग्रुपचे चेअरमन अभय फिरोदिया म्हणाले, सध्या राष्ट्रीय संकट आहे. अशावेळी आम्ही नेहमीच समर्पणवृत्ती दाखविली आहे. ग्रुप हा मराठा चेंबर फाउंडेशन, महत्त्वाचे खासगी रुग्णालये आणि काही एनजीओबरोबर जास्तीत जास्त प्रभावीपणाने काम करणार आहे.
हेही वाचा-जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळित राहण्यासाठी सरकारने घेतली ई-कॉमर्स कंपन्यांची बैठक