ETV Bharat / business

अ‌ॅमेझॉनला धक्का! रिलायन्स-फ्युचरच्या सौद्याला सीसीआयकडून मंजुरी

सीसीआयने रिलायन्स-फ्युचर  ग्रुपच्या सौद्याला मंजुरी दिल्याचे ट्विट केले आहे. फ्युचर ग्रुपचा किरकोळ, घाऊक, गोदाम व्यवसायाचे अधिग्रहण करण्याच्या सौद्याला आयोगाने मंजुरी दिल्याचे सीसीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज
रिलायन्स इंडस्ट्रीज
author img

By

Published : Nov 20, 2020, 7:47 PM IST

हैदराबाद - रिलायन्सने फ्युचर ग्रुपचे अधिग्रहण करणाऱ्या सौद्याला भारतीय स्पर्धा आयोगने (सीसीआय) मंजुरी दिली आहे. या सौद्याला अ‌ॅमेझॉनने यापूर्वीच आक्षेप नोंदविला आहे.

सीसीआयने रिलायन्स-फ्युचर ग्रुपच्या सौद्याला मंजुरी दिल्याचे ट्विट केले आहे. फ्युचर ग्रुपचा किरकोळ, घाऊक, गोदाम व्यवसायाचे अधिग्रहण करण्याच्या सौद्याला आयोगाने मंजुरी दिल्याचे सीसीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे. रिलायन्स रिटेल आणि फॅशन लाईफस्टाईल लि. (आरआरएफएलएल) ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीने किशोर बियानी यांच्या मालकीचा फ्युचर ग्रुपचा व्यवसाय २७ हजार ५१३ कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

अ‌ॅमेझॉन नियामक संस्थांनाही पाठविले पत्र-

फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स रिटेलमधील सौद्याबाबत कार्यवाही करावी, अशी ई-कॉमर्स अ‌ॅमेझॉनने सेबीला विनंती केली आहे. सिंगापूरच्या लवादाने २४ हजार ७१३ कोटींच्या सौद्याला दिलेल्या स्थगितीवर विचार करावा, असे अ‌ॅमेझॉनने सेबीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. सिंगापूरच्या लवादाने रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुपमधील सौद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या निकालाची प्रत अ‌ॅमेझॉनने सेबीसह मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीलाही पाठविली आहे.

हा आहे अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनचा आक्षेप-

अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनने फ्युचर ग्रुपची कंपनी फ्युचर कुपनमध्ये ४९ टक्के हिस्सा घेतला होता. त्यानुसार फ्युचर रिटेलचा हिस्सा घेताना ३ ते १० वर्षांपर्यंत अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनला प्राधान्य मिळावे, अशी करारात अट होती. फ्युचर कुपनचा फ्युचर रिटेलमध्ये ७.३ टक्के हिस्सा आहे. मात्र, फ्युचर ग्रुपने करार करत रिटेलचा घाऊक, किरकोळ व लॉजिस्टिक्सचा व्यवसाय रिलायन्सला दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.