हैदराबाद - स्वदेशी असलेल्या कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. कोरोना लस कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी जुलै ते सप्टेंबरपर्यंत परवानगी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला ६० हून अधिक देशांमध्ये नियामक संस्थांकडून परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अमेरिका, ब्राझील आणि हंगेरी या देशांचा समावेश असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.
हेही वाचा-COVAXIN च्या २ ते १८ वयोगटातील चाचण्या जूनमध्ये, जुलै-सप्टेंबरपर्यंत मिळणार परवानगी
कोव्हॅक्सिनला आपत्कालीन नियामक वापरासाठी परवानगी मिळण्यासाठी भारत बायोटेकने जीनिव्हास्थित जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज केला आहे. जागतिक आरोग्य संस्थेकडून जुलै ते सप्टेंबरमध्ये मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा भारत बायोटेकने व्यक्त केली आहे. कोव्हॅक्सनिला १३हून अधिक देशांमध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेली आहे.
हेही वाचा-भारत आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन लस प्रभावी
आरटी-पीसीआरची निगेटिव्ह चाचणी असल्यास करता येणार प्रवास
बहुतांश देशांनी कोरोना महामारीपासून बचाव होण्यासाठी कोव्हॅक्सिनची शिफारस केली आहे. ज्यांना लस घेतलेली नाही, असे प्रवासी आरटी-पीसीआरची निगेटिव्ह चाचणी घेऊन प्रवास करू शकतात. मात्र, संबंधित देशाने प्रवासावर निर्बंध घातलेले नसावेत, असे भारत बायोटेकने म्हटले आहे.
जून महिन्यापासून कोव्हॅक्सिनच्या लहान मुलांवर होणार चाचण्या-
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचे कित्येक संशोधकांचे म्हणणे आहे. ही लाट कधी येईल याबाबत कोणालाही अंदाज नसला, तरी तिला तोंड देण्याच्या दृष्टीने आतापासूनच प्रयत्न करण्यात येत आहेत. कोव्हॅक्सिन या कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकने आता लहान मुलांवरील क्लिनिकल चाचण्या सुरू करण्याबाबत संकेत दिले आहेत. जून महिन्यापासून या चाचण्या सुरू होणार आहेत, असे कंपनीच्या बिझनेस डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल अॅडव्होकसी प्रमुख डॉ. राचेस एल्ला यांनी सांगितले.