ETV Bharat / business

सीरमपाठोपाठ भारत बायोटकेकडूनही कोव्हॅक्सिनच्या दरात कपात - Covaxin reduces price for state

भारत बायोटेकने लशीच्या दर कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीने म्हटले, की सध्या भारत कोरोनाच्या कठीण अशा संकटातून जात आहे. त्याची भारत बायोटेकला अत्यंत चिंता वाटत आहे.

Bharat Biotech
भारत बायोटेक
author img

By

Published : Apr 29, 2021, 7:07 PM IST

हैदराबाद- पुण्याच्या सीरमने कोव्हिशिल्डचे दर कपात केल्यानंतर भारत बायोटेकनेही लशीच्या दरात कपात केली आहे. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचे दर राज्यांसाठी 200 रुपयांनी केले आहेत. त्यामुळे कोव्हिक्सिनच्या प्रति डोससाठी राज्यांना 600 रुपयांऐवजी 400 रुपये मोजावे लागणार आहेत.

भारत बायोटेकने लशीच्या दर कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीने म्हटले, की सध्या भारत कोरोनाच्या कठीण अशा संकटातून जात आहे. त्याची भारत बायोटेकला अत्यंत चिंता वाटत आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेपुढे प्रचंड आव्हाने असल्याची कंपनीला जाणीव आहे. आम्ही राज्य सरकारांसाठी कोव्हिक्सिनची किंमत प्रति डोससाठी 400 रुपये केले आहे. लशीच्या दराबाबत आम्ही पारदर्शी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. दर हे बीएसएल-३ उत्पादन सुविधा प्रकल्प आणि वैद्यकीय चाचण्यांवरून निश्चित करण्यात येतात. नवसंशोधनात चॅम्पियन होण्याची आमची इच्छा आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसाठी कंपनीची बांधिलकी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

संबंधित बातमी वाचा-सीरमकडून लशीच्या दरात 100 रुपयांनी कपात; राज्यांचे वाचणार कोट्यवधी रुपये

भारत बायोटेकचे पत्र
भारत बायोटेकचे पत्र

केंद्राकडून लस कंपन्यांना किंमत कमी करण्याची सूचना-

केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला कोरोना लशीची किंमत कमी करण्याची सूचना केली होती. संकटाच्या काळात लस कंपन्यांकडून नफेखोरी होत असल्याची विविध राज्यांनी केंद्र सरकारकडे तक्रार केली होती. केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत कोरोना लशीच्या किमतीबाबत चर्चा करण्यात आली होती.

संबंधित बातमी वाचा- लशीच्या किमती कमी करण्याची केंद्राकडून भारत बायोटेकसह सीरमला सूचना

विविध राज्यांचा कोरोना लशीच्या किंमतीबाबत आक्षेप

कोरोना लशीच्या किमतीमध्ये फरक नसल्याने विविध राज्यांनी केंद्र सरकारकडे आक्षेप नोंदविला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशा काळात नफेखोरी करणे योग्य नसल्याचे म्हटले होते. केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व भारतीयांसाठी कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सीरमने बुधवारी राज्यांसाठी असलेल्या कोव्हिशिल्डची किंमत 400 रुपयांवरून 300 रुपये केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.