नवी दिल्ली - सरकारी बँका एनपीएसारख्या समस्येमधून जात आहेत. अशा स्थितीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ८१ कोटींचा निव्वळ नफा मिळविला आहे.
गेल्या वर्षी बँक ऑफ महाराष्ट्राला १ हजार ११९ कोटींचा तोटा झाला होता. बँक ऑफ महाराष्ट्राला जून तिमाहीत २०१८-१९ मध्ये २ हजार ९८७.१० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्राला ३ हजार १९१.८८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्राचे एकूण एनपीएचे प्रमाण हे १७.९० टक्क्यांनी घसरले आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे शेअर हे १.३८ टक्क्याने घसरून १४.३० रुपयावर पोहोचले आहेत.