नवी दिल्ली- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा रोजगारावरही परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे. बजाज इलेक्ट्रिकल्सने उत्तर प्रदेशमधील शिकोहाबादमधील कारखान्यात कर्मचारी कपात केली आहे.
शिकोहाबादच्या कारखान्यामधील कर्मचारी कपात ही 3 एप्रिल 2021 पासून होणार असल्याची माहिती बजाज इलेक्ट्रिकल्सने शेअर बाजाराला माहिती दिली आहे. कंपनीने इंडस्ट्रियल डिस्पुट्स अॅक्ट 1947 कायद्यानुसार ही कर्मचारी कपात जाहीर केली आहे.
हेही वाचा-18 ते 45 वयोगटासाठी कोरोना लसीकरण खुले करा- फिक्कीची सरकारकडे मागणी
बजाज इलेक्ट्रिकल्सच्या संचालक मंडळाने कायम सेवेत असलेल्या 281 कर्मचाऱ्यांची 25 मार्चला स्वेच्छानिवृत्ती मंजूर केली आहे. हे कर्मचारी शिकोहाबादमधील कारखान्यात कार्यरत होते. स्वेच्छानिवृत्तीच्या अंमलबजावणीने कर्मचाऱ्यांना मोठी लवचिकता मिळेल, असा कंपनीने विश्वास व्यक्त केला आहे. बजाज इलेक्ट्रिकल्सची आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 4,987 कोटी रुपयांची उलाढाल होती. कंपनी ग्राहकोपयोगी उत्पादने, फॅन, बल्ब अशी विविध उत्पादने घेतली जातात.
हेही वाचा-आईस्क्रीमची वाढली मागणी ; किमतीत बदल होणार नसल्याचे अमुलचे संकेत