ETV Bharat / business

'या' बँकेच्या १५ हजार कर्मचाऱ्यांनी ९ महिन्यात सोडल्या नोकऱ्या

बँकिंग क्षेत्रात स्वयंचलित कामाचे (ऑटोमेशन) प्रमाण वाढले आहे. तसेच नव्या कौशल्याची गरज भासत आहे. त्यामुळे बँकेंग क्षेत्रात कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण वाढले  आहे.

Employment
रोजगार
author img

By

Published : Jan 10, 2020, 1:29 PM IST

मुंबई - अ‌ॅक्सिस बँकेतील १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी गेल्या नऊ महिन्यात नोकऱ्या सोडल्या आहेत. बँकेने लागणारे मनुष्यबळ लक्षात घेवून २८ हजारहून अधिक जणांना सेवेत घेतले आहे.

बँकिंग क्षेत्रात स्वयंचलित कामाचे (ऑटोमेशन) प्रमाण वाढले आहे. तसेच नव्या कौशल्याची गरज भासत आहे. त्यामुळे बँकेंग क्षेत्रात कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. बँकिंग क्षेत्रात नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण २० ते २२ टक्के झाले आहे. अ‌ॅक्सिस बँकेने सुमारे ७५ हजार कर्मचाऱ्यांना एकाचवेळी सेवेत घेतले होते. बँकेने एप्रिल ते डिसेंबरदरम्यान १२,८०० कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले आहे. गतवर्षी एप्रिल ते डिसेंबरदरम्यान नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण १७ टक्के होते, असे अॅक्सिस बँकेने म्हटले आहे. हे प्रमाण वाढून चालू वर्षात १९ टक्के झाले आहे.

हेही वाचा-शेअर बाजाराने नोंदविला विक्रमी निर्देशांक; खनिज तेलाचे दर घसरल्याचा परिणाम

येत्या २ वर्षात अ‌ॅक्सिस बँक आणि इतर मालकीच्या कंपन्यांमध्ये २५ ते ३० हजार कर्मचारी सेवेत घेतले जाणार आहेत. गेल्या वर्षात अ‌ॅक्सिसने ४०० नव्या शाखा सुरू केल्या होत्या. बँकेने येत्या आर्थिक वर्षात ५५० शाखा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आणखी ४ हजार कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले जाणार आहे. हे कर्मचारी निम्नशहरी, श्रेणी-२ आणि श्रेणी-३ शहरांसह ग्रामीण भागातील असणार आहेत.

हेही वाचा-टाटा-सायरस प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाची एनसीएलएटीच्या निकालाला स्थगिती

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.