ETV Bharat / business

इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख यांच्यावर आणखी एका जागल्याचा निशाणा - सलिल पारेख

जागल्याने इन्फोसिसच्या वित्त विभागात काम करत असल्याचा दावा केला आहे. जर ओळख उघड केली, तर आपल्याविरोधात पारेख प्रत्युत्तर म्हणून कारवाई करतील, अशी या जागल्याने भीती व्यक्त केली.

संग्रहित - इन्फोसिस
author img

By

Published : Nov 12, 2019, 2:29 PM IST

बंगळुरू - इन्फोसिसमध्ये अनुचित प्रकार घडल्याचा दावा कंपनीमधील आणखी (व्हिसलब्लोअर) एका जागल्याने केला आहे. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी पारेख यांनी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला, असा जागल्याने दावा केला. कंपनीचे चेअरमन आणि संचालक मंडळाला तक्रारीवर जुजबी कारवाई करण्याची पारिख यांनी विनंती केल्याचा जागल्याने आरोप केला आहे.

जागल्याने इन्फोसिसच्या वित्त विभागात काम करत असल्याचा दावा केला आहे. जर ओळख उघड केली, तर आपल्याविरोधात पारेख प्रत्युत्तर म्हणून कारवाई करतील, अशी या जागल्याने भीती व्यक्त केली.

हेही वाचा-' देशाची अर्थव्यवस्था येत्या १० ते १५ वर्षात १० लाख कोटी डॉलरची होईल'

जागल्याने काय म्हटले आहे पत्रात ?
पारेख हे कंपनीत रुजू होवून १ वर्षे आणि ८ महिने झाले आहेत. तरीही ते कंपनीचे संचालन मुंबईमधून करत आहेत. कंपनीचा सीईओ हा बंगळुरूमध्ये असावा, मुंबईमध्ये नको, अशी कंपनीची अट आहे. तरी संचालक मंडळ कशामुळे पारेख यांना बंगळुरूमध्ये आणत नाही ? हे पत्र जागल्याने कंपनीचे चेअरमन तथा सहसंस्थापक नंदन निलकेणी आणि संचालक मंडळाच्या स्वतंत्र संचालकांना लिहिले आहे.

हेही वाचा-अलिबाबाची एका दिवसात २ लाख ६६ हजार कोटींची उलाढाल; 'सिंगल्ज'दिवशी नोंदविला विक्रम

कंपनीचा कर्मचारी आणि समभागधारक (शेअरहोल्डर) म्हणून काही गोष्टी निदर्शनास आणण्याचे कर्तव्य असल्याचे जागल्याने म्हटले आहे. पारेख यांच्यामुळे कंपनीची मुल्यव्यवस्था नष्ट होत असल्याचा जागल्याने आरोप केला आहे.

संबंधित बातमी वाचा-जागल्यांच्या दाव्यांप्रमाणे प्रथमदर्शनी पुरावा आढळला नाही - इन्फोसिस

कंपनीने दोन महिन्यांचा अवधी देवूनही पारेख हे मुंबईहून बंगळुरूमध्ये स्थायिक झाले नाहीत. तरी पारेख हे महिन्यातून दोनदा बंगळुरू शहराला भेट देतात. त्यासाठी कंपनीने त्यांना चार बिझनेस दर्जाची विमान तिकिटे आणि स्थानिक प्रवास यासाठी २२ लाख रुपये दिल्याचे जागल्याने म्हटले आहे. याबाबत इन्फोसिसची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

यापूर्वीही काही जागल्यांनी (व्हिसलब्लोअर) इन्फोसिसमध्ये अनुचित प्रकार झाल्याची कंपनीच्या संचालक मंडळाकडे तक्रार केली होती. जागल्यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे प्रथमदर्शनी पुरावे आढळून आले नसल्याचे इन्फोसिसने म्हटले आहे.

Intro:Body:

Another whistleblower guns at Infosys' Salil Parekh

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.