ETV Bharat / business

अमित शाहांकडे एअर इंडियाच्या निर्गुंतवणूकबाबतच्या मंत्रिगटाचे अध्यक्षपद, गडकरींना वगळले

मोदी २.० सरकारमध्ये मंत्रिगटाची पुनर्रचना करण्यात आली आहे. एअर इंडियातील ७६ टक्के शेअर विक्रीसाठी मोदी सरकारने २०१८ मध्ये बोली (बिड्स) लावली होती. मात्र गुंतवणुकदारांनी स्वारस्य दाखविले नसल्याने ही प्रक्रिया बारगळली होती.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 19, 2019, 2:05 PM IST

नवी दिल्ली - सरकारी मालकी असलेल्या एअर इंडियाची निर्गुंतवणूक करण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या मंत्रिगटाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या मंत्रिगटाचे अध्यक्षपद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे असणार आहे. तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना मंत्रिगटातून वगळण्यात आलेले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एअर इंडियाच्या विक्रीकरता स्थापना करण्यात आलेल्या मंत्रिगटामध्ये नवे चार मंत्री असणार आहेत. यामध्ये अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय रेल्वे व वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा समावेश आहे.

हे होते मंत्रिगटामध्ये सदस्य-
एअर इंडिया विशेष पर्याय यंत्रणा (एआयएसएएम) असे या मंत्रिगटाचे नाव आहे. या मंत्रिगटाची जून २०१७ मध्ये स्थापना करण्यात आली. या मंत्रिगटामध्ये ५ सदस्य होते. तर मंत्रिगटाचे अध्यक्षपद हे तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे होते. तर केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री अशोक गजपथी राजू, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, उर्जा आणि कोळसा मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मंत्रिगटात होते.

मोदी २.० सरकारमध्ये मंत्रिगटाची पुनर्रचना करण्यात आली आहे. एअर इंडियातील ७६ टक्के शेअर विक्रीसाठी मोदी सरकारने २०१८ मध्ये बोली (बिड्स) मागविण्यात आली होती. मात्र गुंतवणुकदारांनी स्वारस्य दाखविले नसल्याने ही प्रक्रिया बारगळली होती.

२६ जूलैनंतर एआयएसएएमची बैठक होण्याची शक्यता-

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (डीआयपीएएम) विभागाने एअर इंडियाच्या विक्रीसाठी नव्याने प्रस्ताव तयार केला आहे. एअर इंडियातील शेअरचा हिस्सा विकण्यासाठी पुढील प्रक्रिया मंत्रिगटाकडून निश्चित केली जाणार आहे. संसदेचे अधिवेशन २६ जूलैला संपल्यानंतर एआयएसएएमची बैठक आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये केंद्र सरकारने १.०५ लाख कोटींची निर्गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. गतवर्षी केंद्र सरकारने ८५ हजार कोटी निर्गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.