सॅनफ्रान्सिस्को - अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या ग्राहकांना नवीन सेवा मिळण्याची शक्यता आहे. प्राईमच्या व्हिडिओमध्ये ग्राहकांना 24/7 लाईव्ह प्रोग्रॅम दिसू शकणार आहेत. त्यावर कंपनीकडून काम सुरू करण्यात आले आहे.
लाईव्ह स्ट्रिमिंग सेवेसाठी अॅमेझॉनने काही जागांसाठी उमेदवार नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. लाईव्ह बातम्या, संगीत, पुरस्कार सोहळ्यांचे कार्यक्रम आणि काही विशेष चित्रपट आणि मालिकांचे कार्यक्रम प्राईमवरून दाखविण्यात येणार आहेत.
लिनियर टीव्हीमधून ग्राहकांना आवडीच्या प्रसारणवाहिन्या 24/7 दिसू शकणार आहेत. यामध्ये खेळ व टीव्ही शो असे विविध कार्यक्रम असणार आहेत. ही माहिती कंपनीने दिलेल्या जाहिरातीमध्य दिली आहे. ही जाहिरात प्राईम व्हिडिओच्या लिनियर टिव्हीसाठी प्रिन्सिपल प्रॉडक्ट मॅनेजरसाठी आहे. मात्र, त्याबाबत कंपनीकडून अद्याप पुष्टी मिळाली नाही. जर लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू झाले तर कंपनीला नेटफ्लिक्स आणि डिस्ने प्लसशी स्पर्धा करणे शक्य होणार आहे.