मुंबई - अॅमेझॉन ही ऑनलाईन कंपनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विस्तार करत आहे. अॅमेझॉनने भिंवडीमध्ये नवे फुलफिलमेंट सेंटर सुरू केले आहे.
भिंवडीमधील अॅमेझॉनचे केंद्र हे १.५ दशलक्ष क्युबिक फूट जागेत आहे. या केंद्रामुळे जवळील राज्यात तसेच महाराष्ट्रात ग्राहकांपर्यंत वेगाने उत्पादने पोहोचविणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रातील हे १४ वे केंद्र असणार आहे. तर राज्यामध्ये अॅमेझॉनची ६ दशलक्ष क्युबिक फूट क्षमता झाल्याचे अॅमेझॉनने म्हटले आहे.
हेही वाचा- कच्च्या तेलाच्या वाढत्या दराने शेअर निर्देशांकात ६४२ अंशाची पडझड
देशातील १३ राज्यात ५० केंद्र सुरू करण्याचे अॅमेझॉनचे नियोजन आहे. यामधून चालू वर्षाखेर देशात २५ दशलक्ष क्यूबिक फूट क्षमतेची केंद्र असणार आहेत. फुलफिलमेंट सेंटरमध्ये स्मार्टफोन, ग्राहकोपयोगी उत्पादने, फॅशन आणि एफसीजी उत्पादनांचा साठा ठेवण्यात येतो.
हेही वाचा-प्लास्टिकच्या कचऱ्यातून मिळणार पैसे, या राज्याने आणली अभिनव योजना