नवी दिल्ली - केंद्र सरकारने सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची विक्री करण्यासाठी बोली मागविली आहे. एअर इंडियाची विक्री करण्याचा मोदी सरकारचा हा दुसरा प्रयत्न आहे.
काय आहे ऑफर-
केंद्र सरकारने एअर इंडियामधील १०० टक्के हिस्सा विकण्यासाठी बोली मागणारे कागदपत्रे मंगळवारी जारी केली आहेत. एअर इंडिया खरेदी करणाऱ्या कंपनीला एअर इंडियाच्या कर्जाची ठराविक रक्कम भरावी लागणार आहे. त्यासाठी बोलीमधील नियम सोपे करण्यात आले आहे.
एअर इंडियाची विक्री ही केंद्र सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या उद्दिष्टातील महत्त्वाचा टप्पा आहे. एअर इंडियासह नफ्यातील मालवाहू विमान कंपनी एअर इंडिया एक्सप्रेसच्या शेअरची विक्रीही केली जाण्याची शक्यता आहे. तसेच एअर इंडियाकडून एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्व्हिसेसमधील ५० टक्के हिस्सा विकण्यात येण्याची शक्यता आहे. तिन्ही कंपन्यांना एकत्रितपणे हिस्सा विकणार आहेत. तर एअर इंडियामधील व्यवस्थापनाचे नियंत्रण हे नव्या गुंतवणूकदारांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
हेही वाचा-केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने भारती एअरटेलला टाकले काळ्या यादीत!
खरेदी करणाऱ्यासाठी काय असेल?
केंद्र सरकारने एअर इंडियावरील ४० हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. खरेदी करणाऱ्या कंपनीला एअर इंडियाची १४६ विमाने मिळणार आहेत. यामध्ये ५६ टक्के विमाने ही एअरलाईन ग्रुप आहेत. तर उर्वरित विमाने ही भाड्याने देण्यात आलेली आहेत.
एअर इंडियाकडे देशातील ४,४०० विमानतळावर स्लॉट्स आहेत. तर ४२ देशातील ३,३०० विमानतळावर स्लॉट्स आहेत. हे स्लॉट्स एअर इंडियाची खरेदी केल्यानंतर किमान ६ महिन्यापर्यंत उपलब्ध असणार आहेत. देशातील विमान कंपन्यांची जगभरात होणाऱ्या उलाढालीपैकी ५० टक्के हिस्सा हा एअर इंडियाचा आहे.
हेही वाचा-मोदी सरकारच्या काळात एनजीओला मिळणाऱ्या देणग्यांचा उच्चांक
-एअर इंडियात आहेत ९,६१७ कर्मचारी-
एअर इंडियामध्ये कायम करण्यात आलेले ९,६१७ कर्मचारी आहेत. यामध्ये वैमानिक, केबिन क्रू, सखोल तंत्रज्ञान आणि कामात तज्ज्ञ असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासासह वैद्यकीय सुविधा मिळतात. एअर इंडियाचा महाराजा हा प्रसिद्ध ब्रँड आहे. तसेच उडणारा राजहंस हा लोगो आहे. या दोन्ही बाबी खरेदी करणाऱ्या कंपनीला मिळणार आहेत.