नवी दिल्ली - आर्थिक संकटात सापडलेल्या व्होडाफोन आयडियाने केंद्र सरकारकडे डाटाचे दर प्रति जीबी ३५ रुपये करावेत, अशी मागणी केली आहे. सध्या डाटाचे दर ४ ते ५ रुपये प्रति जीबी आहेत. ही मागणी केल्यास थकित रक्कम भरता येईल आणि व्यवसाय टिकविता येईल, असे कंपनीने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्होडाफोन आयडियाला दूरसंचार विभागाचे ५०,०० हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. हे शुल्क भरण्यासाठी १८ वर्षांची कंपनीला मुदत हवी आहे. तर १ एप्रिलपासून मासिक शुल्कासह कॉलिंगचे दर प्रति मिनिट ६ पैसे करावेत, अशीही व्होडोफोन आयडियाने सरकारकडे मागणी केली आहे.
व्होडाफोनने व्यवसायात तग धरून राहण्यासाठी अनेक मागण्या केल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सागंण्याच्या अटीवर सांगितले. व्होडाफोन आयडियाने जानेवारी महिन्यातच ५० टक्क्यांहून अधिक रिचार्जचे दर वाढविले आहेत.
हेही वाचा-...म्हणून विकीपीडियासह टिकटॉकवर टांगती तलवार
कॉलिंग आणि मोबाईल डाटाचे दर वाढल्याने कंपनीला महसुलात वाढ होईल, अशी अपेक्षा असल्याचे सूत्राने सांगितले. व्होडाफोन आयडियाच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. व्होडाफोनने एजीआरच्या थकित शुल्कातील ३,५०० कोटी रुपये केंद्र सरकारला दिले आहेत.
हेही वाचा-कोरोनाची धास्ती; सोशल मीडियावरील अफवांनी चिकन ७० टक्क्यांनी स्वस्त