नवी दिल्ली – ‘प्राईम डे’च्या यशानंतर अॅमेझॉन इंडियाने 'फ्रीडम डे' या सवलतीच्या योजनांची घोषणा केली. ग्राहकांना ही सवलत योजना 11 ऑगस्टपर्यंत घेता येणार आहे. ग्राहकांना मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, अॅमेझॉन साधनांवर सवलत दिली जाणार आहे.
ग्राहकांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डवर 10 टक्क्यांची जास्तीत जास्त 1,500 रुपयांची सवलत मिळणार आहे. त्यासाठी ग्राहकांना किमान 5 हजार रुपयांची खरेदी करावी लागणार आहे.
क्रेडीट आणि डेबीट कार्डचा वापर करून ग्राहकांना विना व्याज मासिक हप्त्याने खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना बजाज फिन्सरी, अॅमेझॉन पे लेटरचाही खरेदीसाठी पर्याय आहे. ग्राहकांना कारागीर, महिला आंत्रेप्रेन्युअर, नवीन भारतीय ब्रँड, कारागीर यांच्या उत्पादनांचीही खरेदी करण्याचा पर्याय आहे. स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी कारागीर, सहेली असे कार्यक्रम राबविल्याचे कंपनीने म्हटले आहे.
अशी मिळणार ग्राहकांना खरेदीवर सवलत
- हेडफोनच्या खरेदीवर 70 टक्क्यापर्यंत सवलत, कॅमेराच्या खरेदीवर 70 टक्क्यांपर्यत सवलत, स्पिकर आणि होम ओडिओच्या खरेदीवर 60 टक्क्यापर्यंत सवलत दिली जाणार आहे.
- लॅपटॉपच्या खरेदीवर 30 टक्क्यांपर्यत, प्रिंटरच्या खरेदीवर 50 टक्क्यांपर्यंत, गेमिंग असेसरीजवर 40 टक्क्यांपर्यत तर स्मार्टवॉचच्या खरेदीवर 60 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
- फिटनेस ट्रॅकर हे 999 रुपयांपासून पुढे आहे. काही आघाडीच्या कंपन्यांकडून व्यावसायिकांना 2,500 विशेष सवलती दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये लॅपटॉप, हेडफोन अशा घाऊक खरेदीवर मोठी सवलत दिली जाणार आहे.