ETV Bharat / business

द्वेषयुक्त मोहिम राबविल्यास न्यायालयात खटला दाखल करू-अदानी ग्रुप - Adani Group warn against false propaganda

अनाकलनीय अशा शक्तीकडून राबविण्यात येणाऱ्या द्वेषयुक्त मोहिमेचा अदानी ग्रुपवर परिणाम होत आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी अदानी ग्रुपने ट्विटर खुले पत्र पोस्ट केले आहे.

गौतम अदानी
गौतम अदानी
author img

By

Published : Jan 23, 2021, 6:59 PM IST

नवी दिल्ली - ऑनलाईन मोहिम राबवून कंपनीविरोधात चुकीचा प्रोपॅगंडा राबविला जात असल्याचा आरोप अदानी ग्रुपने केले आहे. कंपनीच्या कामकाजाबाबत द्वेषयुक्त मोहिम राबविल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशाराही कंपनीने दिला आहे.

अनाकलनीय अशा शक्तीकडून राबविण्यात येणाऱ्या द्वेषयुक्त मोहिमेचा अदानी ग्रुपवर परिणाम होत आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी अदानी ग्रुपने ट्विटर खुले पत्र पोस्ट केले आहे. अचूकता, वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता हे संतुलित आणि योग्य पत्रकारिते मुलभूत तत्वे आहेत, असे पत्रात नमूद केले आहे.

पुढे पत्रात म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रणनीतीच्या हिताचे नुकसान होत आहे. तसेच आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या समभागधारकांवर परिणाम होत आहे. आमच्यापुढे हितसंरक्षण करण्याशिवाय कोणताही परिणाम नाही. त्यासाठी न्यायालयात दावे दाखल करणार असल्याचा इशारा अदानी ग्रुपने दिला आहे. माध्यमांचा खूप आदर आहे. त्यांच्या विरोधी मतांचाही स्वीकार केल्याचे अदानी ग्रुपने पत्रात म्हटले आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा पूर्ण स्वीकार केला जाणार आहे.

हेही वाचा-हलवा समारंभ संपन्न ; पहिल्यांदाच अर्थसंकल्प छपाईसाठी होणार नाही रवाना

काय आहेत अदानी ग्रुपवर आरोप-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे अब्जाधीश गौतम अदानी आणि त्यांच्या ग्रुपला मोठा फायदा मिळवून दिल्याचे नेहमी आरोप होत राहिले. वादग्रस्त ठरलेले तीन नवीन कृषी कायदेही अदानी ग्रुपला फायदा मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने शेतकऱ्यांवर लादल्याचे आरोप झाले आहेत. मात्र, ग्रुपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. अदानी ग्रुप कंत्राटी शेती करत नाही. केवळ भारतीय अन्नधान्य महामंडळाबरोबर ग्रुप काम करत असल्याचे अदानी ग्रुपने म्हटले आहे.

अदानी यांनी बँकांचे ४.५ लाख कोटी रुपये थकविल्याचा आरोप गेल्या आठवड्यात भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. बँकांचे कर्ज बुडविले नसल्याचे अदानी ग्रुपने म्हटले होते.

हेही वाचा-इंधन दरवाढीचा नवा उच्चांक; मुंबईत पेट्रोल ९२.८ रुपये प्रति लिटर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.