ETV Bharat / business

झायडस लशीच्या आपत्कालीन परवानगीकरिता केंद्राकडे सात ते आठ दिवसांत करणार अर्ज

केंद्रसरकारच्या जैवऔषधी मोहिमेअंतर्गत जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहकार्य परिषद व जैवतंत्रज्ञान विभागाच्या मदतीने ही लस विकसित करण्यात आली आहे. झायडसची लस ही २ ते ८ डिग्री सेल्सियसमध्ये जास्त काळ टिकते.

Zydus Cadila
झायडस कॅडिला
author img

By

Published : Jun 18, 2021, 10:53 PM IST

नवी दिल्ली - देशाला भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनंतर देशातील दुसरी स्वदेशी लस लवकरच मिळण्याची चिन्हे आहेत. औषधी कंपनी झायडस कॅडिलाकडून येत्या सात-आठ दिवसांमध्ये झायकोव्ह-डी या लशीच्या आपत्कालीन वापराकरिता (ईयुए) केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात येणार आहे.

झायकोव्ह-डी ही डीएनए कोव्हिड लस आहे. त्यामध्ये जेनेटिक कोड आहे. त्यामुळे लस घेणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रतिकारक्षमता वाढते. झायडस कॅडिलाची तिसऱ्या टप्प्यात २८ हजार स्वयंसेवकावर चाचणी करण्यात आल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी माध्यमांना सांगितले. ही लस जगातील पहिली डीएनए लस असणार आहे. त्यांच्याबाबत आम्हाला अभिमान असल्याचेही पॉल म्हणाले.

हेही वाचा-पीएमसी बँक तोडगा : आरबीआयकडून सेंट्रमला लघू वित्त बँक स्थापण्याची परवानगी

अशी आहे लस-

केंद्रसरकारच्या जैवऔषधी मोहिमेअंतर्गत जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहकार्य परिषद व जैवतंत्रज्ञान विभागाच्या मदतीने ही लस विकसित करण्यात आली आहे. झायडसची लस ही २ ते ८ डिग्री सेल्सियसमध्ये जास्त काळ टिकते. तर २५ डिग्री सेल्सियस तापमानात कमी काळ टिकते.

हेही वाचा-जीएसटी कपातीचा फायदा; मारुतीची इको रुग्णवाहिका ८८ हजार रुपयांनी स्वस्त

रेमडेसिवीरमधील भेसळ रोखण्यासाठी झायडसकडून खास पॅकेजिंग

कोरोनाबाधितांवरील उपचारात वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनमधील भेसळ रोखण्यासाठी झायडस औषध कंपनीने खास पॅकेजिंक केली आहे. त्या पॅकेजिंगमुळे बनावट अथवा भेसळीचे इंजेक्शन नसल्याची ग्राहकांना खात्री करता येमार आहे. झायडसकडून रेमडॅक (रेमडेसेवीर) आणि विराफीन इंजेक्शनचे कोरोनावरील उपचारासाठी उत्पादन घेण्यात येते. या औषधांच्या पॅकेजवर स्क्रॅचकोड असणार आहे. अशा प्रकारची औषधे ही जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून उत्पादित होणार असल्याचे झायडस कॅडिलाने म्हटले आहे. हे फीचर कंपनीच्या इतर औषधांसाठी वापरण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.