ETV Bharat / business

झोमॅटोकडून 541 कर्मचाऱ्यांना नारळ, कारण...

author img

By

Published : Sep 8, 2019, 5:45 PM IST

झोमॅटोने कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचा वापर करत स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे ग्राहकांकडून अन्नाची ऑर्डर  करण्यात येणाऱ्या चौकशींचे प्रमाण कमी झाल्याचे झोमॅटोने म्हटले आहे.

संग्रहित - झोमॅटो कर्मचारी

नवी दिल्ली - ऑनलाईन फूड कंपनी झोमॅटोने 541 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यासाठी कंपनीने कामकाजाच्या प्रक्रियेत स्वयंचिलत तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचे कारण दिले आहे. कामावरून काढलेले कर्मचारी हे ग्राहक, व्यापारी आणि अन्न घरपोहोच देणाऱ्या टीममधील आहेत.

झोमॅटोने कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचा वापर करत स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे ग्राहकांकडून अन्नाच्या ऑर्डरबाबत होणाऱ्या चौकशींचे प्रमाण कमी झाल्याचे झोमॅटोने म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना कामावरून काढणे , हा निर्णय वेदनादायक असल्याचे झोमॅटोने म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यापूर्वी दोन महिन्यांचा कालावधी (सेव्हरन्स पे) दिल्याचा दावा कंपनीने केला आहे.

हेही वाचा-म्हणून राजधानीमधील हॉटेलांनी ऑनलाईन फूड अॅपमधून सुरू केले 'लॉग आऊट कॅम्पेन'

नव्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार-
गेल्या दोन महिन्यात तंत्रज्ञान आणि कामगिरीत सुधारणा केली आहे. त्यामुळे थेट ग्राहकांकडून ऑर्डरबाबत होणाऱ्या चौकशींचे प्रमाण कमी झाले आहे. कंपनीमध्ये विविध कामांच्या प्रक्रियेत 1 हजार 200 कर्मचारी सेवेत आहे. तर थेट कंपनीत 400 कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या तंत्रज्ञान, उत्पादन आणि डाटा सायन्स टीमसाठी नव्या कर्मचाऱ्यांना कंपनीत घेण्यात येत आहे.

हेही वाचा-झोमॅटो ग्राहकांना देणार 'अमर्यादित थाळी', ही आहे भन्नाट ऑफर

दरम्यान, झोमॅटोचा नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाबरोबर (एनआरएआय) वाद सुरू आहे. कारण कंपनीकडून गोल्ड योजनेतून ग्राहकांना अमर्यादित थाळीसारख्या भरघोस सवलती दिल्या जात आहेत. त्यावर एनआरएआयचा आक्षेप आहे. झोमॅटो आणि स्विग्गीने भरमसाठ सवलतींचा प्रश्न सोडविल्याचे एनआरएआयने 30 ऑगस्टला म्हटले होते. असे असले तरीही, कोणत्याही परिस्थितीमध्ये गोल्ड प्रोग्राम विविध शहरापर्यंत पोहोचविण्याचे झोमॅटोने निश्चित केले आहे.

हेही वाचा-चुका दुरुस्त करू 'लॉग आऊट' मोहीम बंद करा; झोमॅटोची रेस्टॉरन्ट चालकांना विनंती

Intro:Body:

business marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.