ओरिसा - येस बँकेने कामकाज पूर्ववत सुरू होताच दुसऱ्या दिवशी मोठे पाऊल उचलले आहे. बँकेने व्याजासह जगन्नाथ मंदिराला ३९७ कोटी रुपयांचा कॉर्पस फंड दिला आहे.
येस बँकेने कॉर्पस फंड हा पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या स्टेट बँकेच्या खात्यावर जमा केला आहे. येस बँकेने जगन्नाथ मंदिराचे मुख्य प्रशासक कृष्णन कुमार यांना पत्र लिहून कॉपर्स फंड दिल्याचे कळविले आहे.
दरम्यान, येस बँकेवरील तात्पुरते निर्बंध भारतीय रिझर्व्ह बँकने १८ मार्चला काढले आहेत. तर येस बँकेत खासगी बँकांसह स्टेट बँक ऑफ इंडियाने गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा-वॉलमार्ट इंडियाच्या व्यवसायात वाढ; सॅनिटायझरच्या विक्रीवर घातली मर्यादा
काय आहे हा कॉपर्स फंड?
कॉर्पस फंड हे संस्थेचे मुख्य भांडवल असते. हे संस्थेच्या शाश्वतीसाठी ठेवले जाते. सामान्यत: कॉर्पस फंड हा संस्थेच्या प्रशासकीय कामकाजाचा खर्च म्हणून ठेवला जातो.
हेही वाचा-कोरोनाने रुपयाच्या 'आर्थिक' आरोग्यावर परिणाम; डॉ़लरच्या तुलनेत ७० पैशांनी घसरण