मुंबई - सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कॉक्स अँड किंग्जच्या कार्यालय परिसरात छापे मारले आहेत. ही पाची कार्यालये मुंबईमध्ये आहेत. कॉक्स अँड किंग्जचा येस बँकेच्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा ईडीला संशय आहे.
येस बँकेकडून सर्वाधिक कर्ज घेणाऱ्यांमध्ये कॉक्स अँड किंग्ज समावेश आहे. कॉक्स अँड किंग्ज येस बँकेकडून 2 हजार 260 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे ईडीच्या अधिकार्याने सांगितले.
कार्यांलयांच्या परिसरांची झडती घेण्यामागे पुरावे गोळा करणे, हा उद्देश असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
येस बँकेच्या प्रकरणात ईडी अनेक मोठ्या ग्रुपची चौकशी करत आहे. येस बँकेकडून फसवणूक झालेल्या अनेक प्रकरणातील कर्ज बुडीत झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर याला मार्चमध्ये ईडीने अटक केली आहे. त्याच्या विरोधात ईडीने पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.