मुंबई - सक्त अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयाने येस बँकेचा संस्थापक राणा कपूरची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ही कोठडी २ एप्रिलपर्यंत असणार आहे.
येस बँकेतील घोटाळ्याप्रकरणी राणा कपूरला ईडीने ७ मार्चला अटक केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ईडीकडे कपूर याचा ११ मार्चपर्यंत ताबा दिला होता. पाच दिवसांची कोठडी संपल्याने राणा कपूरला विशेष न्यायालयासमोर आज हजर करण्यात आले.
ईडीने येस बँकेमधील वित्तीय अनियमितता आणि डीएचएफएलशी संबंध असल्याचा न्यायालयात युक्तिवाद करत कपूरच्या कोठडीची मागणी केली. यावर न्यायालयाने कपूरची २ एप्रिलपर्यंत कोठडी रवानगी केली आहे.
हेही वाचा-बंदमधून शेअर बाजाराला वगळले; बँकांचेही व्यवहार राहणार सुरू
गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे संचालक मंडळ निलंबित केले आहे.