नवी दिल्ली - केंद्र सरकारने व्हॉट्सअपला गोपनीयतेचे धोरण काढण्याची सूचना केल्यानंतर कंपनीने भूमिका स्पष्ट केली आहे. प्रस्तावित गोपनीयेतच्या धोरणातून वापरकर्त्यांचा डाटा फेसबुकशी वापर करण्याबाबत कोणताही बदल होणार नाही. त्या मुद्द्याबाबत असलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी खुले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
केंद्र सरकारने व्हॉट्सअपच्या प्रस्तावित गोपनीयतेच्या धोरणावर १४ प्रश्न कंपनीला विचारले आहेत. त्यावर व्हॉट्सअपच्या प्रवक्त्याने म्हटले की, पारदर्शकता देणे हे आमचे ध्येय आहे. नवीन पर्यायामुळे व्यवसाय हे ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देऊ शकणार आहेत. तसेच ते व्यवसाय वाढवू शकणार आहेत. व्हॉट्सअप हे इन्ड टू इन्ड इन्क्रिप्टेड असलेल्या वैयक्तिक संदेशाचे नेहमी संरक्षण करते. त्यामुळे वापरकरत्यांचे संदेश हे व्हॉट्सअप अथवा फेसबुक पाहू शकत नाहीत.
हेही वाचा-व्हॉट्सअपने गोपनीयतेचे धोरण मागे घ्यावे; केंद्राची कंपनीला सूचना
व्हॉट्सअप अपडेटबद्दल असलेल्या चुकीच्या माहितीवर काम करत आहोत. त्यावरील प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उपलब्ध आहोत.
काय म्हटले आहे भारत सरकारने व्हॉट्सअपला लिहिलेल्या पत्रात?
- माहितीची गोपनीयता, निवडीचे स्वातंत्र्य आणि डाटा सुरक्षा याबाबत कंपनीने पुनर्विचार करावा, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
- भारतीयांचा पूर्णपणे आदर करावा.
- कोणतेही एकांगी बदल आणि अटी योग्य नाही. तसेच ते अस्वीकारार्ह आहेत.
- देशात व्हॉट्सअपचे ४०० दशलक्ष वापरकर्ते आहेत.
गोपनीयतेचे धोरण बदलण्याचा निर्णय पुढे ढकलला-
प्रायव्हसी म्हणजेच युजरच्या गोपनीयतेसंदर्भातील अपडेट पुढे ढकलत असल्याची घोषणा व्हॉट्सअॅपने केली आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीमुळे वापरकर्त्यांमध्ये माहितीबाबत असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाले होते. युजरची माहिती सार्वजनिक करण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता कंपनीने एक पाऊल मागे घेत मोठा निर्णय घेतला. अपडेट पुढे ढकलत असल्याने ग्राहकांना नव्या धोरणाचा आढावा घेण्यासाठी आणि नियमावली स्वीकारण्यास वेळ मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. लोकांमध्ये चुकीची माहिती पसल्यामुळे गोपनीय माहितीचा अपडेट पुढे ढकलण्यात आल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. तसेच कोणाचेही खाते बंद होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
व्हॉट्सअपचे असे आहे नवे धोरण-
व्हाट्सअपकडून डाटावर कशी प्रक्रिया केली जाते. डाटा कसा स्टोअर केला जातो, आदी बाबीबाबत धोरण बदलण्यात येत आहे. हे अपडेट ८ फेब्रुवारीपासून लागू होणार होते. फेसबुकच्या अटी मान्य केल्यानंतर हे अपडेट होणार आहे.
तुमचा डाटा सुरक्षित नाही-
सायबर सेक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक कर्नल इंद्रजि सिंह म्हणाले की, नव्या धोरणानुसार तुम्ही जे काही व्हॉट्सअपवर शेअर करणार आहात, ते गोपनीय राहणार नाही. यामध्ये तुमचे चॅट, ग्रुप चॅट, कॉन्टॅक्ट डीपी, पेमेंटची माहिती आदींचा समावेश आहे. जरी व्हॉट्सअपकडून इन्ड टू इन्ड एनक्रिप्शनचा दावा केला जात असला तरी तुमचा डाटा सुरक्षित नाही.