सॅन फ्रान्सिस्को - फेसबुक आणि ट्विटरचे इंटरनेट विश्वात वर्चस्व निर्माण होत असताना त्यावर टीकाही होत आहे. या टीकाकारामध्ये विकिपिडीयाचे सहसंस्थापक लॅरी सँगर यांची भर पडली आहे. फेसबुक इंटरनेट खूप नियंत्रण करत असल्याची टीका सँगर यांनी केली. त्यांना इंटरनेटची मूळ संकल्पना काय हे समजू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले.
विकिपिडीयाचे सहसंस्थापक लॅरी सँगर यांनी अमेरिकेतील माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत इंटरनेट आणि सोशल मीडियावर मत व्यक्त केले. ते म्हणाले, इंटरनेट खरोखर धक्कादायक होत चालले आहे. इंटरनेट हे झुकेरबर्गसारख्या लोकांनी तयार केले नाही. तसेच आज सिलिकॉन व्हॅलीमध्ये बसलेल्या कॉर्पोरेट एक्झक्युटिव्हसारख्या लोकांनीही ते घडविले नाही. त्यांची तशी वृत्ती नाही, तसेच त्यांची क्षमतादेखील असणार नाही. सँगर यांनी इंटरनेटचे विकेंद्रीकरण आणि ते मुक्त करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडिया या वापरकर्त्यांचा डाटा वापरून फायदा मिळवित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते तुम्ही कसा अनुभव घ्यायचा, हे ठरवू शकता. तुम्ही बसल्यानंतर तुम्ही काय पाहायचे हे ते ठरवू शकतात. तुम्ही केवळ मशिनमधील चाक बनता, असेही त्यांनी म्हटले होते.
फेसबुकचा संस्थापक मार्क्स झुकेरबर्गने फेसबुकवरील नियंत्रण सोडून द्यावे, असे फेसबुकचे माजी मुख्य सुरक्षा प्रमुख अॅलेक्स स्टॅमोस यांनी नुकतेच म्हटले होते. तसेच मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांच्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमावा, असेही त्यांनी म्हटले होते. खूप नियंत्रण असणे हा कायदेशीर वादाचा मुद्दा आहे. तरी झुकेरबर्ग काही अधिकार सोडून देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते.
अमेरिकेच्या काही लोकप्रतिनिधींनी फेसबुक बंद करण्याची मागणी केली होती. फेसबुककडून डाटा लिक करणे आणि गोपनीयतेच्या नियमांचे उल्लघंन झाल्याने त्यांनी ही भूमिका घेतली होती.
विकिपिडीयाचे सहसंस्थापक लॅरी सँगर यांनी सोशल मीडिया बंद करावा, यासाठी मोहीम सुरू केली आहे.