ETV Bharat / business

औद्योगिक उत्पादन घटले, निवडणुकीच्या अनिश्चिततेसह निर्यातीचे प्रमाण कमी झाल्याचा परिणाम

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार जानेवारीत औद्योगिक उत्पन्नाचा निर्देशांक हा गतवर्षीच्या तुलनेत १.७ टक्क्याने घसरला आहे. उत्पादन क्षेत्र, भांडवली आणि ग्राहकापयोगी वस्तु उत्पादन कमी झाल्याने हा निर्देशांक घसरला आहे.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 25, 2019, 3:37 PM IST

नवी दिल्ली - देशातील औद्योगिक उत्पादनांचा निर्देशांक कमी झाल्याचे समोर आले आहे. निर्यातीचे घटलेले प्रमाण, ग्रामीण भागातील चिंताजनक स्थिती, कर्जाची मर्यादा आणि निवडणुकीच्या परिणामाबाबतची या कारणाने औद्योगिक उत्पादन घटल्याचे अहवालात म्हटले आहे.

औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक फेब्रुवारी २०१९ मध्ये ३ ते ३.२ टक्के वाढेल, असा डुन आणि ब्रॅडस्ट्रीटचा (डी अँड बी) आर्थिक अंदाज होता. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार जानेवारीत औद्योगिक उत्पन्नाचा निर्देशांक हा गतवर्षीच्या तुलनेत १.७ टक्क्याने घसरला आहे. उत्पादन क्षेत्र, भांडवली आणि ग्राहकापयोगी वस्तु उत्पादन कमी झाल्याने हा निर्देशांक घसरला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी अनिश्चिततेची स्थिती असल्याने गुंतवणुकीचे प्रमाण कमी झाले आहे. डी अँड बीच्या अंदाजानुसार ग्राहक दर निर्देशांक (सीपीआय) हा मार्चमध्ये २.६ ते २.८ टक्के राहणार आहे. तर घाऊक क्षेत्रातील महागाईचा निर्देशांक हा ३ ते ३.२ टक्के राहील, असे अहवालात म्हटले आहे. बँकिंग क्षेत्रातील आर्थिक तणावाची स्थिती, जीएसटीतील घट, तसेच दूरसंचार, उर्जा आणि स्थावर मालमत्ता या जोखमीच्या बाबी असल्याचे डी अँड बीचे मुख्य आर्थिकतज्ज्ञ अमित सिंग यांनी सांगितले.

Intro:Body:

Weak exports, rural distress, uncertainty over election outcome to drag down IIP: Report

 Dun and Bradstreet,Economy Forecast,food prices ,GST,banking sector ,IIP data, डी अँड बी, औद्योगिक उत्पादन CSO

औद्योगिक उत्पादन घटले, निवडणुकीच्या अनिश्चिततेसह निर्यातीचे प्रमाण कमी झाल्याचा परिणाम  

नवी दिल्ली - देशातील औद्योगिक उत्पादनांचा निर्देशांक कमी झाल्याचे समोर आले आहे. निर्यातीचे घटलेले प्रमाण, ग्रामीण भागातील  चिंताजनक स्थिती, कर्जाची मर्यादा आणि निवडणुकीच्या परिणामाबाबतची या कारणाने औद्योगिक उत्पादन घटल्याचे अहवालात म्हटले आहे.  

औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक फेब्रुवारी २०१९ मध्ये ३ ते ३.२ टक्के वाढेल, असा डुन आणि ब्रॅडस्ट्रीटचा  (डी अँड बी)  आर्थिक अंदाज होता. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार जानेवारीत औद्योगिक उत्पन्नाचा निर्देशांक हा गतवर्षीच्या तुलनेत १.७ टक्क्याने घसरला आहे. उत्पादन क्षेत्र, भांडवली आणि ग्राहकापयोगी वस्तु उत्पादन कमी झाल्याने हा निर्देशांक घसरला आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी अनिश्चिततेची स्थिती असल्याने गुंतवणुकीचे प्रमाण कमी झाले आहे. 

डी अँड बीच्या अंदाजानुसार ग्राहक दर निर्देशांक (सीपीआय) हा मार्चमध्ये २.६ ते २.८ टक्के राहणार आहे. तर घाऊक क्षेत्रातील महागाईचा निर्देशांक हा ३ ते ३.२ टक्के राहील, असे अहवालात म्हटले आहे. 

बँकिंग क्षेत्रातील आर्थिक तणावाची स्थिती,  जीएसटीतील घट, तसेच दूरसंचार, उर्जा आणि स्थावर मालमत्ता या जोखमीच्या बाबी असल्याचे डी अँड बीचे मुख्य आर्थिकतज्ज्ञ अमित सिंग यांनी सांगितले. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.