मुंबई - चीनबरोबर आपण व्यापार सुरू ठेवायला हवा, असे मत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केले. ते 'व्हर्च्युल एशिया इकॉनॉमिक डायलॉग २०२१' या कार्यक्रमात बोलत होते. जिथून कच्चा माल स्वस्त मिळेल तेथून खरेदी करावा, असेही बजाज यांनी म्हटले आहे.
व्हर्च्युल एशिया इकॉनॉमिक डायलॉग २०२१ या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन हे पराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरने आयोजन केले आहे. या कार्यक्रमात बोलताना राजीव बजाज म्हणाले की, आशियाई देशांमध्ये उद्योगानूकलता आणि कामकाज करणे हे भारतापेक्षा अधिक सोपे आहे.
हेही वाचा-मारुती सुझुकीने गाठला मैलाचा दगड; आजपर्यंत एकूण २० लाख कारची निर्यात
सर्वसमावेशकता असण्याची गरज
पुढे राजीव बजाज म्हणाले की, जागतिक कंपनी असल्याचा आमचा विश्वास आहे. माझ्या मनाप्रमाणे आणि सांस्कृतिकदृष्ट्या केवळ कर्मचारीच नव्हे तर डीलर, वितरक आणि जगभरातून होणाऱ्या पुरवठादारांमध्ये सर्वसमावेशकता असण्याची गरज आहे. त्यामुळेच भारताने चीनबरोबर व्यापार करावा यावर माझा विश्वास आहे. जर अशा मोठ्या देशाबरोबर व्यवसाय केला तर अशा मोठ्या बाजारपेठेमधून आपण आपल्यामधील अपूर्णत्व वेळीच शोधू शकणार आहोत. तसेच आपल्याला अनुभव मिळणार आहे.
हेही वाचा-वैयक्तिक गोपनीयतेचा भंग; टिकटॉक अमेरिकेतील राज्याला देणार ९२ दशलक्ष डॉलर