नवी दिल्ली - अॅमेझॉनच्या व्हिडिओ स्ट्रिमिंग सेवेप्रमाणेच फ्लिपकार्ट सेवा सुरू करणार आहे. फ्लिपकार्टची व्हिडिओ स्ट्रिमिंग सेवा विविध भाषांमध्ये असणार आहे. देशातील २० कोटी इंटरनेट वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठीही सेवेचा फायदा होणार आहे.
फ्लिपकार्टला ई-कॉमर्स व्यवसायात अॅमेझोनबरोबर तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी फ्लिपकार्ट व्हिडिओज हे नि:शुल्क फ्लिपकार्ट अॅपवर उपलब्ध करून देणार आहे. त्यामध्ये शॉर्ट फिल्म, संपूर्ण चित्रपट आणि मालिकेचे भाग असणार आहेत. हा कंटेण्ट देण्यासाठी फिल्पकार्ट विविध कंटेण्ट निर्मिती करणाऱ्यांसाठी चर्चा करणार आहे.
आगामी सणाच्या तोंडावर कंपनीकडून ही सेवा आणली जात आहे. विशेष म्हणजे ई-कॉमर्स कंपन्यांचा सर्वात अधिक व्यवसाय याच काळात अधिक होतो. फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, आम्ही खूप गुंतवणूक करत आहोत. वापरकर्त्यांनी शॉपिंग व्यतिरिक्त इतरही वेळही प्लॅटफॉर्मवर घालवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कंटेण्ट ही वापरकर्त्यांना आकर्षित करण्याची संधी आहे. आम्ही ई-कॉमर्स म्हणूनही कार्यरत राहणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
फ्लिपकार्टची स्पर्धक असलेल्या अॅमेझॉनच्या प्राईम व्हिडिओचे वार्षिक शुल्क ९९९ रुपये व मासिक शुल्क हे १२९ रुपये आहे. येत्या काही वर्षात ई-कॉमर्सचा व्यवसाय १०० अब्ज डॉलर होईल, असा अंदाज आहे.