लंडन - विदेशात फरार झालेल्या कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंग्लंडच्या न्यायालयाने मल्ल्याविरोधात निकाल देत भारताची बाजू मान्य केली आहे.
विजय मल्ल्याला भारतात पाठविण्याची २०१८ मध्ये केलेली मागणी लंडनमधील उच्च न्यायालयाने मंजूर केली आहे. मल्ल्याने किंगफिशर आणि इतर कंपन्यांची चुकीची माहिती दिल्याचा भारताने आरोप केला होता.
हेही वाचा-बीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
भारताने प्रत्यार्पणाच्या केलेल्या मागणीविरोधात मल्ल्याने लंडनमधील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. रॉयल कोर्ट ऑफ जस्टीसच्या न्यायमूर्ती स्टीफन आयर्विन आणि न्यायाधीश एलिझाबेथ लैंग यांनी मल्ल्याचे अपील फेटाळून लावले. मल्ल्यावर ९ हजार कोटी रुपयांची बँकांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा- भारताच्या नव्या एफडीआय नियमाने चीनचा तिळपापड; ही' दिली प्रतिक्रिया