ETV Bharat / business

अमेरिकेने जीएसपीचा दर्जा काढल्याने जेम्स आणि ज्वेलरी निर्यातीवर होणार परिणाम

author img

By

Published : Jun 18, 2019, 2:04 PM IST

जीएसपीचा दर्जा काढून घेतल्याने भारतामधून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या जेम्स आणि ज्वेलरीवर ७ टक्के आयात शुल्क वाढणार आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांच्या नफ्यात घट होणार आहे.

संग्रहित

मुंबई - सध्या जेम्स आणि ज्वेलरी क्षेत्र हे भांडवलाची कमतरता इत्यादी समस्यांमधून जात आहे. अशा स्थितीत या क्षेत्रापुढील समस्येत आणखी वाढ होणार आहे. अमेरिकेने व्यापार प्राधान्यक्रम यादीतून भारताला वगळल्याचा जेम्स आणि ज्वेलरी उद्योगाच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे.

जेम्स आणि ज्वेलरी क्षेत्रासाठी अमेरिका ही प्रमुख निर्यातदार देश आहे. पतमानाकंन संस्थेच्या आकडेवारीनुसार जेम्स आणि ज्वेलरीच्या एकूण निर्यातीपैकी १५ टक्के निर्यात भारत अमेरिकेत करतो. जीएसपीचा दर्जा काढून घेतल्याने भारतामधून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या जेम्स आणि ज्वेलरीवर ७ टक्के आयात शुल्क वाढणार आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांच्या नफ्यात घट होणार आहे. तर निर्यातदारांना अमेरिकेतील उद्योगाशी स्पर्धा करणे कठीण जाणार असल्याचे क्रिसिल रिसर्चचे संचालक हेतल गांधी यांनी सांगितले. मात्र देशाच्या एकूण निर्यातीवर मर्यादित परिणाम होईल, असे अहवालात म्हटले आहे. भारताचा अमेरिकेबरोबर १४२.१ अब्ज डॉलर एवढा व्यापार झाला आहे. तर ८३.२ अब्ज डॉलरची निर्यात करण्यात आली आहे. औषधी क्षेत्रावर कमी परिणाम होणार आहे.

जेेम्स म्हणजे मौल्यवान खडे असतात. याचा विविध दागिने आणि अंगठीत वापर होतो.

Intro:Body:

Buz 05

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.