नवी दिल्ली - अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाने देशातील चामडे उद्योगाला निर्यातीसाठी प्रचंड संधी असल्याचे सीएलईचे चेअरमन पी. आर. अकील अहमद यांनी सांगितले. या क्षेत्राचा गेल्या चार महिन्यात सात टक्के वृद्धीदर झाल्याचेही त्यांनी सांगितले. ते नॅशनल एक्सपोर्ट एक्सेलन्स अॅवार्ड कार्यक्रमात बोलत होते.
चामडे निर्यात ही केवळ किमतीतच नव्हेतर संख्येनेही वाढत असल्याचे सीएलईचे चेअरमन पी. आर. अकील अहमद यांनी सांगितले. या क्षेत्रामधून महिलांना मोठा रोजगार मिळत आहे. निर्यात वाढीसाठी काही पावले उचलली आहेत. कामगारकेंद्रित असलेल्या या उद्योगात विदेशी चलन आणण्याची मोठी क्षमता आहे. तसेच तरुणांना रोजगार मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी चामडे उद्योगातून निर्यात वाढावी, याकरिता २ हजार ६०० कोटींचे पॅकेज यापूर्वीच जाहीर केले आहे. जागतिक आर्थिक मंदी असतानाही चामडे उद्योगात रोजगार आणि उत्पादन वाढल्याचे त्यांनी सांगितले. युरोपात चामड्याची ७० टक्के निर्यात केली जाते. तर या उद्योगात ४४ लाख लोक कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
-
Shri P.R.Aqeel Ahmed, Chairman, CLE presenting memento to Shri Nitin Gadkari, Hon'ble Union Minister for Road Transport & Highways and Micro, Small and Medium Enterprises at the CLE National Export Excellence awards function in New Delhi on 14.11.19. pic.twitter.com/2FxIEzGnTD
— CLE INDIA (@cle_india) November 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Shri P.R.Aqeel Ahmed, Chairman, CLE presenting memento to Shri Nitin Gadkari, Hon'ble Union Minister for Road Transport & Highways and Micro, Small and Medium Enterprises at the CLE National Export Excellence awards function in New Delhi on 14.11.19. pic.twitter.com/2FxIEzGnTD
— CLE INDIA (@cle_india) November 14, 2019Shri P.R.Aqeel Ahmed, Chairman, CLE presenting memento to Shri Nitin Gadkari, Hon'ble Union Minister for Road Transport & Highways and Micro, Small and Medium Enterprises at the CLE National Export Excellence awards function in New Delhi on 14.11.19. pic.twitter.com/2FxIEzGnTD
— CLE INDIA (@cle_india) November 14, 2019
चामडे निर्यात परिषद (काउन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट्स) ही दरवर्षी निर्यात करणाऱ्या उद्योगाला पुरस्कार जाहीर करते. या पुरस्काराचे आज वितरण करण्यात आले आहे.