वॉशिंग्टन - भारताला अधिक महत्त्वाकांक्षी संरचनात्मक आणि वित्तीय क्षेत्रात आर्थिक सुधारणांची तातडीने गरज आहे. तसेच कर्जाची पातळी वाढत असताना मध्यम मुदतीच्या वित्तीय धोरणाची गरज असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमफ) म्हटले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आयएमफचे प्रवक्ते गेर्री राईज यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देशातील आर्थिक वातावरण कमकुवत झाले आहे. महसूल मिळवून खर्चामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी अंदाज केला होता, त्याहून अधिक भारतामधील आर्थिक वातावरण कमुकवत झाले आहे. या वर्षी वित्तीय धोरण अधिक लवचिक आहे. हे योग्य आहे. वित्तीय धोरण आणखी लवचिक असणे योग्य असणार आहे.
हेही वाचा-अवमान प्रकरणी कारवाई का करू नये, दूरसंचार कंपन्यांना 'सर्वोच्च' विचारणा
आयएमएफने चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर कमी होवून ४.८ टक्के होईल, असा अंदाज केला आहे.