ETV Bharat / business

'विकासकांनी घरांच्या किमती कमी करायलाच पाहिजेत' - पियुष गोयल न्यूज

उदय कोटक यांनी आज पहिली पत्रकार परिषद घेतली. त्यांची भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआय‌आय) अध्यक्षपदी निवड झाली आहे. घरांच्या किमतीबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या मताशी सहमत असल्याचे कोटक यावेळी म्हणाले.

Uday Kotak
उदय कोटक
author img

By

Published : Jun 4, 2020, 6:36 PM IST

नवी दिल्ली- बांधकाम विकासकांनी घरांच्या किमती कमी करायला पाहिजेत, असे मत सीआयआयचे नूतन अध्यक्ष उदय कोटक यांनी व्यक्त केले. त्यामुळे परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होतील असेही कोटक म्हणाले.

उदय कोटक यांनी आज पहिली पत्रकार परिषद घेतली. त्यांची भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआय‌आय) अध्यक्षपदी निवड झाली आहे. घरांच्या किमतीबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या मताशी सहमत असल्याचे कोटक यावेळी म्हणाले.

रोजगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि नव्या नोकऱ्या तयार करण्यासाठी लक्ष केंद्रित करणार असल्याचे कोटक यांनी सांगितले.

व्हिडिओद्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेचे आयोजन नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल आयोजित केले होते. यावेळी गोयल विकासकांना उद्देशून म्हणाले, तुम्हाला घरे विकण्याआधी पूर्वीचे प्रकल्प पूर्ण करावी लागणार आहेत. कारण निर्माणाधीन प्रकल्पात ग्राहक कधीच घरे घेणार नाही. मी माझ्या आयुष्यात निर्माणाधीन फ्लॅट कुणाकडूनही खरेदी करणार नाही, असेही गोयल म्हणाले.

पियुष गोयल यांनी विकासकांना व्यवसायाचा सल्लाही यावेळी दिला. ते म्हणाले की, तुम्हाला प्रकल्प पूर्ण करावी लागणार आहेत. भागीदार आणि गुंतवणूकदार मिळवावे लागणार आहेत. जर तुम्ही प्रकल्प पूर्ण केले नाहीत, तर वस्तूस्थितीला अनुसरूनच विकावी घरे विकावी लागणार आहेत. तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही.

दरम्यान, बांधकाम विकासकांची (CREDAI MCHI) संघटनेने घरांच्या किमती कमी करणे, हा पर्याय नसल्याचे एका अहवालात म्हटले होते. संघटनेने विकसकांना घरांच्या किमती कमी करू नका, असा सल्ला दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.