ETV Bharat / business

अमेरिकन कंपन्यांनी देशातच उत्पादने तयार करावीत; डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन

author img

By

Published : May 12, 2019, 2:26 PM IST

अमेरिका आणि चीनमधील व्यापार विषयावरील दोन दिवसीय चर्चा शुक्रवारी फिस्कटली. त्यानंतर अमेरिकेने आयात शुल्क वाढविण्याचे 'व्यापारी हत्यार' चीनवर उगारले आहे.

डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन कंपन्यांनी देशातच उत्पादने तयार करावीत, असे आवाहन केले आहे. यामुळे उत्पादनासाठी होणारा अतिरिक्त खर्च टळू शकेल, असेही ट्रम्प म्हणाले. सध्या व्यापार विषयावरून चीन आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत.

आयात शुल्क वाचविण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता ? तुम्ही तुमची उत्पादने अमेरिकेतच तयार करा. ते खूप सोपे आहे, असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी केले.

व्यापारविषयक चर्चेदरम्यान दिलेले आश्वासन पाळण्यात चीन अपयशी ठरल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. त्यामुळे ट्रम्प यांनी चीनच्या २० हजार कोटी डॉलर मुल्यांच्या उत्पादनांवरील आयात शुल्क दुप्पट करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. उर्वरित ३० हजार कोटी डॉलर मुल्यांच्या उत्पादनांवरील आयात शुल्कही वाढविण्यात आल्याचे अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लिगथेझर यांनी सांगितले.

अमेरिका आणि चीनमधील व्यापार विषयावरील दोन दिवसीय चर्चा शुक्रवारी फिस्कटली. त्यानंतर अमेरिकेने आयात शुल्क वाढविण्याचे 'व्यापारी हत्यार' चीनवर उगारले आहे. चीनने बौद्धिक संपदाच्या अधिकाराची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी अमेरिकेची मागणी आहे. तर अमेरिकने संतुलित व्यापारी सौदा करावा, अशी चीनची मागणी आहे. अमेरिकेने चीनच्या उत्पादनावरील आयात शुल्क वाढविले तर त्याचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर आणि अनेक शेतकऱ्यांवर वाईट परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. चीनने व्यापारी युद्धादरम्यान अमेरिकेच्या सुमारे १० हजार कोटी डॉलरच्या उत्पादनांवरील आयात शुल्क वाढविले आहे.

स्वस्तात उपलब्ध होणारे कामगार आणि करामधील सवलती यामुळे अनेक अमेरिकन कंपन्यांचे चीनमध्ये उत्पादन प्रकल्प आहेत. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन कंपन्यांना केलेले आवाहन महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

Intro:Body:

business 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.