ETV Bharat / business

महामारीतही पेट्रोल-डिझेल महागल्याने वाहतूकदार संघटनेकडून निषेध - transporters body on Fuel rate

सध्याची स्थिती ही महसूल कमवण्याची नाही, असे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने म्हटले आहे. ही संस्था देशातील 95 लाख ट्रक मालकांचे प्रतिनिधित्व करते.

File photo
संग्रहित
author img

By

Published : Jun 12, 2020, 6:39 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या महामारीतही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहे.‌ त्यामुळे वाहतूकदारांची संघटना एआय‌एमटीसीने निषेध व्यक्त केला आहे. वाहतूक व्यवसाय करणे फायद्याचे होत नाही. अशा स्थितीत इंधनाचे दर कमी करावे, अशी संघटनेने मागणी केली.

सध्याची स्थिती ही महसूल कमवण्याची नाही, असे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने म्हटले आहे. ही संस्था देशातील 95 लाख ट्रक मालकांचे प्रतिनिधित्व करते. पेट्रोलचे दर शुक्रवारी प्रति लिटर 57 पैशांनी आणि डिझेलचे दर 59 पैशांनी वाढले आहेत. गेली सलग सहा दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत.

रोज वाढत असलेल्याइंधनाच्या दराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत असल्याचे संघटनेने म्हटले. देश कोरोनाच्या संकटातून जात असताना इंधनाचे दर कमी करावे, अशी संघटनेने मागणी केली. ही लोकांना व विविध अर्थव्यवस्थेतील क्षेत्रांना मदत करण्याची वेळ असल्याचे आयएमटीसीचे अध्यक्ष कुलतरुण सिंग अटवाल यांनी सांगितले.

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने सरकारला देशाबद्दल व वाहतूक क्षेत्राबद्दल सहानभुती नसल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले. इंधनाचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार आहे. संपूर्ण देशात महागाई वाढणार असल्याचेही त्यांनी म्हटले. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कमी होत असतानाही सरकारने त्याचा ग्राहकापर्यंत कधी लाभ दिला नाही, असा त्यांनी आरोप केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.