नवी दिल्ली – प्रेक्षकांना पसंतीच्या प्रसारण वाहिन्या निवडण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) स्वत: अॅप लाँच केले आहे. यापूर्वी अनेक प्रेक्षकांनी डीटीएच ऑपरेटरने दिलेल्या अॅपवरून प्रसारण वाहिन्या निवडणे शक्य होत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर ट्रायने अॅप लाँच करून ग्राहकांनी सोय उपलब्ध करून दिली आहे.
नवे अॅप लाँच करण्यामागे सर्व सेवा पुरठादारांना एकत्र आणण्याचे आणणे, हा उद्देश असल्याचे ट्रायने म्हटले आहे. टीव्ही चॅनेल सलेक्टर अॅप हे गुगल प्ले आणि अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहेत.
नव्या नियमानुसार ग्राहकांना त्यांना पसंतीच्या प्रसारणवाहिन्या निवडता येतात. त्यासाठी त्यांना पूर्ण पॅक खरेदी करण्याची गरज नाही. तसेच स्वतंत्रपणे प्रसारवाहिन्यांसाठी शुल्क भरतात. यापूर्वी डीटीएच वाहिन्या ग्राहकांना पूर्ण पॅक खरेदी करण्यासाठी सक्ती करत असतात. परंतू, ट्रायच्या नव्या नियमामुळे ग्राहकांना हव्या त्या वाहिन्या निवडता येतात अथवा बंद करता येतात.