ETV Bharat / business

'टिकटॉक'च्या सीईओंची फेसबुकवर टीका, म्हणाले... - Latest Tiktok news

इन्स्टाग्रामने टिकटॉकमधील काही लोकप्रिय क्रिएटरला रिल्ससाठी आकर्षित करण्याकरता आर्थिक प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. रिल्स हे पुढील महिन्यात अमेरिकेत लाँच होणार आहे. फेसबुकच्या रिल्स अपमध्ये रेकॉर्ड, इडिट आणि व्हिडिओ शेअर करण्याचा वापरकर्त्यांना पर्याय देण्यात येणार आहे.

संग्रहित - टिकटॉक
संग्रहित - टिकटॉक
author img

By

Published : Jul 30, 2020, 2:52 PM IST

सॅनफ्रान्सिस्को – फेसबुककडून टिकटॉकप्रमाणेच व्हिडिओ आणि संगीताचे मिश्रण असलेले रिल्स हे अ‌ॅप तयार करण्यात येत आहे. यावरून टिकटॉकचे सीईओ केवीन मेयर यांनी फेसबुक कंपनीवर निशाणा साधला आहे. फेसबुक हे टिकटॉकची नक्कल करत असल्याची मेयर यांनी टीका केली आहे.

टिकटॉकचे सीईओ केविन मेयर यांनी ब्लॉग पोस्ट करत प्रतिस्पर्धी कंपनी फेसबुकवर टीका केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, की टिकटॉक हे स्पर्धेचे स्वागत करते. योग्य स्पर्धेमुळे आपण अधिक चांगलो होतो, असे आम्हाला वाटते. मात्र ग्राहकांच्या सेवेसाठी योग्य आणि मुक्त स्पर्धा करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मात्र, आमची स्पर्धक असलेल्या फेसबुकसारखे हल्ला करू नये. ज्यांची इच्छा आहे, त्यांनी स्पर्धात्मक उत्पादने आणावीत. मात्र, फेसबुककडून रिल्ससारखी नक्कल करणारी उत्पादन आणली जात आहेत. यापूर्वी लॅस्सू हे फेसबुकचे उत्पादन लवकरच अपयशी ठरले होते.

इन्स्टाग्रामने टिकटॉकमधील काही लोकप्रिय क्रिएटरला रिल्ससाठी आकर्षित करण्याकरता आर्थिक प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. रिल्स हे पुढील महिन्यात अमेरिकेत लाँच होणार आहे. फेसबुकच्या रिल्स अॅपमध्ये रेकॉर्ड, इडिट आणि व्हिडिओ शेअर करण्याचा वापरकर्त्यांना पर्याय देण्यात येणार आहे.

देशाचे संरक्षण आणि सार्वभौमत्व यांचा विचार करता भारत सरकारने टिकटॉकसारख्या 59 चिनी अॅपवर बंदी घातली आहे. अमेरिकेतही टिकटॉकवर बंदी लागू करावी, अशी अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींनी यापूर्वी ट्रम्प प्रशासनाकडे मागणी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.