ETV Bharat / business

टिक-टॉकला पर्याय देणाऱ्या ‘चिंगारी’त 10 कोटींची विविध कंपन्यांकडून गुंतवणूक

author img

By

Published : Aug 10, 2020, 6:41 PM IST

चिंगारीच्या वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‌ॅप स्टेटस, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स अशा गोष्टींमधून प्रतिभा दाखविणे शक्य आहे. हे अॅप मराठी, गुजराती, कन्नड अशा विविध आठ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

चिंगारी अॅप
चिंगारी अॅप

नवी दिल्ली – टिकटॉकवर सरकारने बंदी लागू केल्यानंतर व्हिडिओ शेअरिंग अॅप चिंगारीला वापरकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कंपनीत विविध कंपन्यांनी बीज भांडवल म्हणून 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

चिंगारीत अँजेललिस्ट इंडिया, उत्सव सोमानीज आयसीड, व्हिलेज ग्लोबल, लॉगएक्स व्हेंचर्स आणि जसविंदर सिंग गुलाटी ऑफ नाउफ्लोट्सने गुंतवणूक केली आहे.

चिंगारी अॅपचे सीईओ आणि सहसंस्थापक सुमित घोष म्हणाले, की आमच्या अॅपमध्ये आणि व्हिजनमध्ये गुंतवणूकदारांनी क्षमता पाहिल्याने आम्ही आनंदित आहोत. हे गुंतवणूकदार हे चिंगारीच्या प्रवासात सहभागी झाले आहेत. विविध ब्रँडकडून मिळणाऱ्या एकूण रुपयांपैकी कंटेन्ट निर्मात्यांना 30 टक्के रुपये देण्यात येतात, असा कंपनीने दावा केला.

वापरकर्त्यांना पारदर्शकता आणि डाटा गोपनीयतेची खात्री देत आहोत, असेही कंपनीने म्हटले आहे. अॅपचे दररोज सुमारे 3 दशलक्ष वापरकर्ते आहेत. चिंगारीच्या वापरकर्त्यांना व्हाट्सअप स्टेटस, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स अशा गोष्टींमधून प्रतिभा दाखविणे शक्य आहे. हे अॅप मराठी, गुजराती, कन्नड अशा विविध आठ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

आत्मनिर्भर भारत अभियानात पटकाविला पहिला क्रमांक

दरम्यान, 'आत्मनिर्भर भारत अभियान अॅप इनोव्हेशन' स्पर्धेमध्ये चिंगारीचा पहिला क्रमांक आला आहे. या स्पर्धेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जुलैला उद्घाटन केले होते. त्यामागे देशातील अॅप तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे हा हेतू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.