सॅन फ्रान्सिस्को - जर व्हॉट्सअॅप वापरत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. जगभरातील काही जुन्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप बंद होणार आहे.
फेसबुकने व्हिडोंज फोनमधील व्हॉट्सअॅप ३१ डिसेंबरपासून बंद होणार असल्याचे म्हटले आहे. येत्या काही महिन्यांत व्हॉट्सअॅप लाखो स्मार्टफोनमधून बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपकडून काही स्मार्टफोनला दिले जाणारे तांत्रिक सहाय्य थांबविले जाणार आहे. १ फेब्रुवारी २०२० पासून आयफोन आयओएस ८ किंवा त्याहून जुन्या व्हर्जन असल्यास व्हॉट्सअप चालणार नाही. तसेच अँड्राईड डिव्हाईस हे २.३.७ किंवा त्याहून जुने व्हर्जन असल्यास व्हॉट्सअॅप काम करणार नाही.
हेही वाचा-'ही' सुविधा न दिल्यास कंपन्यांना रोज द्यावा लागणार ५ हजारांचा दंड
सध्या, या ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या स्मार्टफोनच्या वापरकर्त्याला नवे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करता येत नाही. मायक्रोसॉफ्टनेही विंडोज १० मोबाईल ओएसचे तांत्रिक सहाय्य थांबविले नाही. त्यामुळे फेसबुकनेही या स्मार्टफोनची सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-नव्या वर्षात कांद्यासह बटाट्याच्या किमती कमी होण्याची शक्यता
व्हॉट्सअॅप ही फेसबुकच्या मालकीची कंपनी आहे.फेसबुकने व्हॉट्सअॅप हे १९ अब्ज डॉलरला २०१४ मध्ये विकत घेतले आहे.