सॅनफ्रान्सिस्को- एलॉन मस्कने टेस्लासाठी नवीन वेबसाईट लाँच केली आहे. त्यामधून इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.
टेस्ला कम्युनिटी मेंबरला नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि विचारपूर्वक कृती करण्यासाठी माध्यम देणे हा वेबसाईटचा उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यावर वापरकर्ते हे वेबसाईटवर पोस्ट करू शकतात. तसेच पोस्ट लाईक करू शकतात. तसेच ते इतरांचे अकाउंटचे अनुसरण करू शकत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्या कल्पना सांगितल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. काही वापरकर्त्यांनी ग्राहक सेवा विभागांशी थेट संपर्क यंत्रणा देण्याचे सूचविले आहे.
हेही वाचा-कोरोनाशी लढा: टीव्हीएस कंपनी सर्व कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना देणार मोफत लस
टेस्लाचे बंगळुरूमध्ये कार्यालय सुरू-
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी जाहीर केल्याप्रमाणे टेस्लाने अखेर भारतात प्रवेश केला आहे. टेस्लाकडून टेस्ला इंडिया मोटार्स आणि इनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची देशात नोंदणी झाली आहे. नुकतेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्ला कारच्या वितरणाची पूर्ण यंत्रणा २०२१ मध्ये भारतात असणार असल्याचे म्हटले होते. तसेच जगामधील सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादक देश होण्याची भारतामध्ये क्षमता आहे, असा विश्वास व्यक्त केला होता.
हेही वाचा-कच्च्या तेलाचे दर कमी करण्याच्या भारताच्या मागणीवर सौदीने 'हा' दिला सल्ला