मुंबई - टेक महिंद्रा चालू वर्षात जूनपर्यंत ५ हजार जणांना सेवेत घेणार आहे. त्यासाठी कॅम्पस मुलाखती घेतल्या जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
महिंद्रा ग्रुप कंपनीमध्ये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत १.२१ लाख मनुष्यबळ आहे. कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी मनोज भट म्हणाले की, कंपनी मनुष्यबळ वाढविणार आहे. त्यासाठी आम्ही चालू तिमाहीसह पुढील दोन तिमाहीत कॅम्पस मुलाखती घेण्याचे नियोजन केले आहे. यामधून ५ हजार मनुष्यबळ वाढणार आहे. कंपनी क्षमता वाढविणार आहे.
हेही वाचा-सेबीकडून किशोर बियानीसह त्यांचे बंधु अनिल यांच्यावर एका वर्षाची बंदी
दरम्यान, आयटी कंपनी टेक महिंद्राला बीपीओच्या व्यवसायामधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली आहे. असे असले तरी कंपनी येत्या आर्थिक वर्षात कंपनी ५ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कारण, कंपनीकडून कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित यंत्रणेकेडून मोठ्या प्रमाणात काम करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानामुळे एकाच कर्मचाऱ्याला अनेक कामे करता येणे शक्य आहेत. त्यामुळे मनुष्यबळात कपात करणे शक्य असल्याचे टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक सी. पी. गुरनानी यांनी सांगितले.
हेही वाचा-आरबीआयचा दणका; सेवा विकास सहकारी संस्थेला ठोठावला ५५ लाखांचा दंड