ETV Bharat / business

'व्होडाफोन'ला दिलासा; ट्रायच्या 'त्या 'आदेशाला टीडीएसएटीकडून तात्पुरती स्थगिती

author img

By

Published : Jul 17, 2020, 5:41 PM IST

ट्राय ही चौकशी करत कायद्याचे पालन करून अंतिम आदेश देण्यासाठी स्वतंत्र आहे. मात्र, नैसर्गिक न्याय मिळवून देण्याकरता व्होडाफोन आयडियाला संधी दिल्याचे टीडीएसएटीने आदेशात म्हटले आहे.

व्होडाफोन आयडिया
व्होडाफोन आयडिया

नवी दिल्ली – दूरसंचार क्षेत्राची लवाद संस्था टीडीएसएटीने व्होडाफोन आयडियाला दिलासा दिला आहे. व्होडाफोन आयडियाला प्रिमियमचे प्लॅन तात्पुरते थांबविण्याचे ट्रायने आदेश दिले होते. या आदेशाला टीडीएसएटीने तात्पुरती स्थगिती दिली आहे.

व्होडाफोनने जादा शुल्क आकारून 4जी नेटवर्कची वेग देणारी प्रिमियम योजना ग्राहकांसाठी सुरू केली आहे. जादा शुल्काने ग्राहकांना वेगवान डाटा दिल्याने इतर ग्राहकांची सेवा विस्कळित होवू शकते, अशी ट्रायने पत्रातून चिंता व्यक्त केली होती. हा मुद्दा अधोरेखित करत ट्रायने व्होडाफोन आयडियाला प्रिमिअय प्लॅन बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला व्होडाफोन आयडियाने टीडीएसएटीमध्ये सोमवारी आव्हान दिले.

ट्राय ही चौकशी करत कायद्याचे पालन करून अंतिम आदेश देण्यासाठी स्वतंत्र आहे. मात्र, नैसर्गिक न्याय मिळवून देण्याकरता व्होडाफोन आयडियाला संधी दिल्याचे टीडीएसएटीने आदेशात म्हटले आहे.

हा आहे व्होडाफोनचा प्रिमियम प्लॅन

व्होडाफोन आयडियाकडून रेडएक्स प्रिमियम पोस्टपेड ही गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू केली आहे. यामध्ये मासिक 999 रुपयांहून अधिक प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना 50 टक्क्यांहून अधिक वेगवान ४जीची सेवा मिळणार असल्याचे व्होडाफोनने जाहीर केले आहे. या प्लॅनसाठी ग्राहकांना मेपासून मासिक 1,099 रुपये द्यावे लागत आहेत.

दरम्यान, दूरसंचार कंपन्यांना ट्रायने स्पर्धा करू द्यावी. ग्राहकांना त्यांचे पर्याय निवडू द्यावेत, अशी अपेक्षा दूरसंचार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.