मुंबई - वाहन उद्योग मंदीमधून जात असतानाच टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये आज १० टक्के घसरण झाली आहे. या घसरणीने टाटा मोटर्सच्या शेअरची किंमतीने गेल्या ५२ आठवड्यातील निचांक गाठला आहे.
टाटा मोर्टसचे शेअरची किंमत दुपारी २ वाजून ५१ मिनिटाला ९.२५ टक्क्यांनी घसरून ११२ रुपयावर पोहोचली. तर निफ्टीमध्ये शेअरची किंमत १०९.५० रुपये झाली. निफ्टीच्या ऑटो निर्देशांकात ०.७५ टक्क्यांची घसरण झाली आहे. अशोक लिलँड, अपोलो टायर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टीव्हीएस मोटर्सच्या शेअरची घसरण झाली आहे.
बाह्य वातावरण खूप आव्हानात्मक असल्याचे टाटा मोटर्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. मागणी कमी झाल्याने त्याप्रमाणे उत्पादनाची जुळवाजुळव करत आहोत. त्याप्रमाणे कंत्राटी मनुष्यबळ आणि कामाच्या पाळींची (शिफ्ट्स) संख्या बदलत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.