मुंबई - भारतामध्ये आयफोन 13 लाँच होताच आयफोनच्या चाहत्यांनी ऑनलाईन खरेदी सुरू केली आहे. आयफोन 13 ची सर्वप्रथम ऑनलाईन डिलिव्हरी फ्लिपकार्ट व अॅमेझॉनवरून झालेली नाही. तर सर्वप्रथम ऑनलाईन डिलिव्हरी ही टाटा ग्रुपच्या टाटा क्लिक या ई-कॉमर्स वेबसाईटवरून झाली आहे.
टाटा क्लिकवरून खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकाला शनिवारी सकाळी 8 वाजता आयफोन 13 ची डिलिव्हरी करण्यात आली आहे. ही डिलिव्हरी खास अशा ब्लॅक बॉक्समधून करण्यात आली आहे. टाटा क्लिकचे मुख्य पुरवठा साखळी अधिकारी संदीप कुलकर्णी म्हणाले, की आम्ही सतत नाविन्यपूर्ण गोष्टी करत आहोत. त्यामधून ग्राहकांना चांगला अनुभव देत आहोत. व्हाईट-ग्लोव्हड डिलिव्हरी हा असाच ग्राहकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न आहे.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजारात 958 अंशांची उसळी; नोंदविला आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक
हा आजपर्यंतचा सर्वाधिक संस्मरणीय अनुभव
ग्राहक सलाम शेख म्हणाले, की नवीन आयफोन 13 सकाळी मिळणे हा छान अनुभव होता. त्यामुळे दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला. टाटा क्लिकचा आभारी आहे. माझे कुटुंब आणि मला हा आजपर्यंतचा सर्वाधिक संस्मरणीय अनुभव होता.
या दिवशी टाटा क्लिक देणार खरेदीवर सवलत-
टाटा क्लिक ही ब्रँडची सर्वाधिक वेगाने वाढणारी भारतामधील ऑनलाईन बाजारपेठ आहे. टाटा क्लिक 5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2021 दरम्यान ग्राहकांना फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, सौंदर्य प्रसाधने आणि घरगुती उत्पादनांच्या खरेदीवर सवलती देणार आहे.
संबंधित बातमी वाचा-अॅपलकडून आयफोन 13 लाँच; जाणून घ्या, किमतीसह वैशिष्ट्ये
भारतामध्ये आयफोन 13 ची किती असणार किंमत?
आयफोन 13 प्रो हा भारतामध्ये 1,19,900 रुपयांना उपलब्ध आहे. तर आयफोन 13 प्रो मॅक्स हा 1,29,900 रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना 17 सप्टेंबरपासून अॅपलचे स्टोअर apple.com/in/store वरून नवीन आयफोनची खरेदी करता येणार आहे.