ETV Bharat / business

आरोग्य सेतूवरून 'ती' वेबसाईट हटविली, केंद्राची उच्च न्यायालयाला माहिती

author img

By

Published : Jun 17, 2020, 4:48 PM IST

दक्षिण केमिस्ट आणि डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनने आरोग्य सेतूवरून ‘आरोग्य सेतू मित्र’ ही वेबसाईट हटविण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. ‘आरोग्य सेतू मित्र’ ही वेबसाईट ई-फार्मसीसाठी मार्केटिंग करणारे साधन असल्याचे भासविण्यात असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले होते.

Arogya Setu app
आरोग्य सेतू

नवी दिल्ली – आरोग्य सेतूवरून औषधांची विक्री करणारी वेबसाईट हटविल्याचे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला माहिती दिली. आरोग्य सेतूचा वापर करून ऑनलाईन औषध विक्रीसाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे एका संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दक्षिण केमिस्ट आणि डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनने आरोग्य सेतूवरून ‘आरोग्य सेतू मित्र’ ही वेबसाईट हटविण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ‘आरोग्य सेतू मित्र’ ही वेबसाईट ई-फार्मसीसाठी मार्केटिंग करणारे साधन असल्याचे भासविण्यात असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले होते. केंद्र सरकारने ती वेबसाईट हटविल्याची न्यायालयात माहिती दिल्यानंतर उच्च न्यायालयाने ती रद्द केली आहे.

आरोग्य सेतूमध्ये ब्ल्यूटूथ आणि जीपीएसचा वापर करून वापरकर्त्याला संपर्कात कोरोनाबाधित आल्यास अलर्ट देण्यात येतात. यापूर्वी केंद्र सरकारने असामान्य स्थितीत वेबसाईट तयार केल्याचे उच्च न्यायालयात सांगितले होते. त्यामागे कोराना रुग्णांना सहज औषधे मिळावीत, हा हेतू असल्याचे केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले होते. सरकारी माध्यमातून खासगी व्यापाराला प्रोत्साहन देण्याचा कोणताही हेतू नसल्याचेही केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला दिलेल्या माहिती म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.