हैदराबाद - स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि कॅनरा बँकेचे कामकाज विस्कळित होण्याची शक्यता आहे. कारण विविध बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी १५ व १६ मार्चला संपाचा इशारा दिला आहे.
एसबीआयने शेअर बाजाराला १० मार्चला दिलेल्या माहितीत म्हटले की, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने १५ व १६ मार्चला संप पुकारला आहे. ही माहिती इंडियन बँक असोसिएशनने एसबीआयला दिली आहे. सर्व बँक व त्यांच्या शाखांमध्ये कामकाज सुरळित राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. असे असले तरी बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार असल्याचे एसबीआयने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. बँकांचे १५ व १६ मार्चला संपादिवशीही कामकाज सुरळित राहण्यासाठी गेल्याच आठवड्यात पावले उचलल्याचे कॅनरा बँकेने म्हटले आहे.
हेही वाचा-मागील सरकारने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबले, कुटुंबीयांचा थेट आरोप
- महिन्यातील दुसरा शनिवार (१३ मार्च) आणि साप्ताहिक सुट्टी असल्याने रविवारी (१४ मार्च) बँका बंद असणार आहेत. त्यामुळे एकूण सलग चार दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
- फेब्रुवारीमध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (युएफबीयू) या नऊ कर्मचाऱ्यांच्या संघटनेने दोन दिवसांचा संप १५ मार्चपासून पुकारणार असल्याचे जाहीर केले होते.
- दोन सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात सादर केला आहे. या निर्णयाला बँक कर्मचारी संघटनांचा विरोध आहे.
हेही वाचा-अधिवेशन संपताच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील संघ मुख्यालयात
यापूर्वी केंद्र सरकारने मार्च २०१७ मध्ये सार्वजनिक बँकांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने देशातील २७ सार्वजनिक बँकांची संख्या ही एकूण १२ इतकी झाली आहे.