हैदराबाद - डॉ. रेड्डीज लॅबोरटीजने रशियन लस स्पूटनिक व्ही हैदराबादमध्ये पथदर्शीपणे सॉफ्ट लाँच केले आहे. स्पूटनिक लस ही लवकरच मुंबई, बंगळुरू आणि नवी दिल्लीमध्ये उपलब्ध होणार आहे.
स्पूटनिक लशीची लोकांना कोविनवर नोंदणी मिळत नाहीत. व्यापारी पद्धतीने स्पूटनिकचे लाँचिंग झाल्यानंतर ही लस कोविनवर उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा-नादारी प्रक्रियेतील डीएसके डेव्हलपरच्या खरेदीकरता दोन कंपन्यांकडून निविदा दाखल
या शहरांमध्ये लस उपलब्ध होणार-
स्पूटनिक व्हीचे १४ मे रोजी हैदराबादमध्ये लाँचिंग झाले. ही लस विशाखापट्टणम, बड्डी, चेन्नई, मिरयालगौडा आणि कोल्हापूरसह आणखी शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. भारतामध्ये 12.5 कोटी स्पूटनिक लशीच्या विक्रीसाठी डॉ. रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंड फंडबरोबर करार केला आहे. भारताला स्पूटनिक व्हीचे सुमारे 30 लाख डोस मिळाले आहेत.
हेही वाचा-शेअर बाजारात 271 अंशांची घसरण; गुंतवणूकदारांचे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या निर्णयाकडे लक्ष
लस पुरवठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज
उणे १८ सेल्सियस अंश तापमानात लशीचा साठा करणे, कोविनमध्ये नोंदणी करणी, लॉजिस्टिक्सची माहिती ट्रॅक करणे याचा पथदर्शी नियोजनात सहभाग आहे. पुरेशा कोल्ड चेन युनिटस आणि वाहतुकीची रुग्णालयापर्यंत सुविधा करण्यात येत असल्याचे डॉ. रेड्डीजने म्हटले आहे.
स्पूटनिक व्ही लशीबाबत महत्त्वाचे मुद्दे
- डॉ. रेड्डीजने सप्टेंबर 2020 मध्ये रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीतून स्पूटनिक व्हीची चाचणी घेण्यात येणार आहे.
- स्पूटनकि व्ही ही लस विकसित करणाऱ्या गॅमेलेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इपिडिमिलॉजी आणि मायक्रोबायॉलॉजीला भारतात 125 दशलक्ष लशीचे डोस देण्याची परवानगी मिळालेली आहे.
- यापूर्वीच आरडीआयएफचे सीईओ किरील दमित्रिएव यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत भारतामध्ये 50 दशलक्ष डोसचे उन्हाळ्यात उत्पादन केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी आरडीआयएफने भारतामधील पाच औषधी कंपन्यांबरोबर करार केले आहेत.
- स्पूटनिक व्ही भारतामध्ये उपलब्ध होणारी कोरोनावरील तिसरी लस असणार आहे. यापूर्वी भारताने भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमची कोव्हिशिल्ड या लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
- कोरोनापासून संरक्षण मिळविण्यासाठी फायझर, स्पूटनिक व्ही आणि मॉर्डना लसीचे प्रत्येकी दोन डोस घ्यावे लागतात. तर कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे दोन डोस घ्यावे लागतात.