हैदराबाद - कोरोना लशीची प्रतिक्षा असलेल्या नागरिकांना दिलासादायक बातमी आहे. रशियन कोरोना लस स्पूटनिक व्ही लशींचे ३० लाख डोस हे हैदराबादमधील राजीव गांधी आंततराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत.
ग्रेटर हैदराबाद एअर कार्गोने (जीएचएसी) रशियन लस हैदराबादमधील विमानतळावर पोहोचल्याची माहिती दिली आहे. रशियाहून आरयू-९४५० हे मालवाहू विमान रात्री ३ वाजून ४३ मिनिटाला हैदराबादला पोहोचले आहे. यापूर्वीही जीएमआर विमानतळाने लशीची वाहतूक हाताळली आहे. आज ५६.६ टन आयात झालेली लस ही सर्वात मोठी लशीची आयात आहे. विमातळावरील सर्व प्रक्रिया पूर्ण पार पडलेली आहे. केवळ ९० मिनिटांमध्ये लस ही पोहोचविलेली जाणार आहे. स्पूटनिक व्ही लशीला विशेष हाताळणी आणि साठा असण्याची गरज आहे. ही लस उणे २० अंश तापमानात ठेवावी लागत असल्याची माहिती जीएचएसीने दिली आहे.
हेही वाचा-होंडा मोटरसायकलकडून पुन्हा उत्पादन सुरू; डीलरला करणार आर्थिक मदत
जीएचएसी ही पुरवठा साखळीसाठी तज्ज्ञांशी, सीमा शुल्कातील अधिकारी आणि संबंधित सर्व भागीदारांशी चर्चा करत आहे. त्यामधून एअर कार्गो टर्मिनलमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा आणि हाताळणीची प्रक्रिया चागल्या पद्धतीने होईल, अशी अपेक्षा असल्याचे जीएचएसीने म्हटले आहे.
हेही वाचा-२०२०-२१मध्ये देशाच्या जीडीपीमध्ये ७.३ टक्क्यांची घसरण!
स्पूटनिक व्हीच्या आपत्कालीन वापरासाठी डॉ. रेड्डीज लॅबला परवानगी
डॉ. रेड्डीज लॅबोरटीजने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडबरोबर १२.५ कोटी लशींचे डोस भारतात विकरण्यासाठी करार केला आहे. भारतीय औषधी नियंत्रकांनी स्पूटनिक व्हीच्या आपत्कालीन वापरासाठी डॉ. रेड्डीज लॅबला परवानगी दिली आहे. डॉ. रेड्डीजला नुकतेच आरडीआयएफकडून २ लाख लशींचे डोस मिळाले आहे. अपोलो रुग्णालयाबरोबर भागीदारी करून डॉ. रेड्डीज लॅबने पथदर्शी पद्धतीने लस लाँच केली आहे.
स्पूटनिक व्ही लशीबाबत महत्त्वाचे मुद्दे
- डॉ. रेड्डीजने सप्टेंबर २०२० मध्ये रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीतून स्पूटनिक व्हीची चाचणी घेण्यात येणार आहे.
- स्पूटनकि व्ही ही लस विकसित करणाऱ्या गॅमेलेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इपिडिमिलॉजी आणि मायक्रोबायॉलॉजीला भारतात १२५ दशलक्ष लशीचे डोस देण्याची परवानगी मिळालेली आहे.
- यापूर्वीच आरडीआयएफचे सीईओ किरील दमित्रिएव यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत भारतामध्ये ५० दशलक्ष डोसचे उन्हाळ्यात उत्पादन केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी आरडीआयएफने भारतामधील पाच औषधी कंपन्यांबरोबर करार केले आहेत.
- स्पूटनिक व्ही भारतामध्ये उपलब्ध होणारी कोरोनावरील तिसरी लस असणार आहे. यापूर्वी भारताने भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमची कोव्हिशिल्ड या लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
- कोरोनापासून संरक्षण मिळविण्यासाठी फायझर, स्पूटनिक व्ही आणि मॉर्डना लसीचे प्रत्येकी दोन डोस घ्यावे लागतात. तर कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे दोन डोस घ्यावे लागतात.